Coronavirus: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप, घशात खवखव; स्वत:च्या घरी आयसोलेट

मात्र, ताप आणि घसा बिघडल्याने त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीबद्दल अधिक काळजी घेतली जात आहे.

Arvind Kejriwal (Photo Credits: PTI)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. त्यांना बारीक ताप आणि घसा खवखवणे (Sore Throat) अशी लक्षणे दिसत आहेत. लक्षणे दिसताच त्यांनी स्वत:हूनच स्वत:ला घरामध्ये आयसोलेट करुन घेतले आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सर्व बैठका आणि दिनक्रमातील कार्यक्रम रद्द केले आहेत. प्राप्त माहिती अशी की, उद्या त्यांच्या कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे. आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले की, मुख्यमंत्री केजरीवाल यांना प्राथमिक लक्षणे दिसत आहेत. त्यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे किंवा नाहीत हे चाचणीनंतरच समजू शकणार आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रतिदिन दुपारी 2 वाजता दिल्ली येथे कोरोना व्हायरस स्थितीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतात. मात्र, ताप आणि घसा बिघडल्याने त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या प्रकृतीबद्दल अधिक काळजी घेतली जात आहे. केजरीवाल यांनी ताप आल्यानंतरच सर्व सरकारी कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत. (हेही वाचा, Coronavirus: PIB मुख्य माहिती महासंचालक के.एस. धतवालिया यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटीव्ह; एम्स रुग्णालयात उपचार सुरु)

दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांची होणार कोरोना चाचणी स्वतला करुन घेतले क्वारंटाइन - Watch Video 

राजधानी दिल्ली मधील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढत निघाली आहे. रुग्णांचा आकडा 27 हजार 654 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 1320 नवी प्रकरणं पुढे आली आहेत. आतापर्यंत 761 लोकांचा मृत्यू जाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सध्यास्थितीत 219 कंटेनेमेंट झोन आहेत. महत्त्वाचे असे की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कालच एक राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ज्यात उप-मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्यासर अनेक अधिकारी उपस्थित होते.