'Delhi Chalo' Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर ठाम, दिल्ली हाय अलर्टवर; वाहतुकीवर निर्बंध, सीमा बंद; जाणून घ्या 10 मुद्दे

ज्यामुळे शेतकरी नेते 'चलो दिल्ली' आंदोलनावर ठाम (Farmers Protest News) आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि दिल्ली पोलीस हाय (Delhi Police) अलर्टवर आहेत.

Delhi Police on Farmers Protest | (Photo Credits: ANI)

Delhi Farmers Protest: केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये सोमवारी (12 फेब्रुवारी) सुरु असलेली बैठक कोणत्याही तोगड्याशिवाय संपली. ज्यामुळे शेतकरी नेते 'चलो दिल्ली' आंदोलनावर ठाम (Farmers Protest News) आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा (Haryana Farmers Protest) आणि दिल्ली पोलीस हाय (Delhi Police) अलर्टवर आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा संभाव्य प्रश्न टाळण्यासाठी पोलिसांनी रस्त्यांवरील अडथळे वाढवले आहेत. दिल्लीमध्ये प्रवेश करणाऱ्या सीमा बंद केल्या आहेत. शिवाय, इंटरनेट, बल्क एसएमएस आदी वापरांवरही निर्बंध घातले आहेत. जाणून घ्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित महत्त्वाचे 10 मुद्दे.

बैठकीत तोडगा नाही: केंद्रीय मंत्र्यांच्या एका समितीसोबत सुरु असलेली बोलणी फिसकटल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते म्हणाले, सरकारकडे कोणताही अजेंडा नाही. त्यांना फक्त वेळ काढायचा आहे. दुसऱ्या बाजूला सरकारने मात्र म्हटले आहे की, शेतकरी नेत्यांशी समाधानकारक आणि विस्तारीत बोलणे झाले. चर्चेदरम्यान बहुतांश मुद्द्यांवर एकमत झाले आहे. मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी एक सूत्र ठरविण्यात आले. (हेही वाचा, Farmers’ March: शेतकरी आंदोलनाची हाक, राजधानीकडे कूच; दिल्ली-यूपी सीमेवर कलम 144 लागू, शंभू सीमा सील)

शेतकरी नेत्यांचा मोर्चाचा संकल्प: केंद्रीय मंत्र्यांसोबत पाच तासांच्या बैठकीनंतर, शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी 'चलो दिल्ली' मोर्चा पुढे नेण्याचा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप पंढेर यांनी केला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन सुरुच राहील असे ते म्हणाले.

कृषी मंत्र्यांचा आशावाद: शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी आशावाद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, बहुतेक मुद्द्यांवर एकमत झाले असले आहे. मात्र, ज्या मुद्द्यांवर तोडगा निघू शकला नाही त्याबाबत समितीच्या स्थापनेद्वारे निराकरण केले जाईल.

सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत: पाठिमागील आंदोलनात दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचे आणि आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. यापैकी कोणतेच आश्वासन सरकारने पाळले नाही. किमान आधारभूत किंमत (MSP) वर कायदेशीर हमी देण्याची मागणी सरकारने मान्य केली होती. त्यावरही अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी मोर्चावर ठाम आहेत.

पोलिसांनी वाढवली सुरक्षा: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. अनेक ठिकाणी कलम 144  लागू केले आहे. काही ठिकाणी संचारबंदी आणि मोठ्या सभा, मेळाव्यांवर बंदी घातली आहे. खास करुन सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर बॅरिकेड्स, काँक्रीट ब्लॉक्स आणि काटेरी तारांसह सीमा बंद केल्या आहेत. इंटरनेट वापरावरही मर्यादा आहेत.

नियोजित मार्च तपशील: 'दिल्ली चलो' मोर्चा सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, पंजाबच्या संगरूरमधील शेतकऱ्यांच्या नेतृत्वात, देशभरातील 200 हून अधिक शेतकरी संघटनांच्या अपेक्षित सहभागासह हा मोर्चा दिल्लीच्या सीमेवर धडक देईल.

व्हिडिओ

हरियाणा पोलिसांनीही वाढवली सुरक्षा: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारनेही सुरक्षा वाढविण्यावर भर दिला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी रस्त्यांवर काँक्रीट ब्लॉग आणि लोखंडी खिळे मारुन रस्ते बंत करण्यात आले आहेत.

वाहतूकीत बदल: दिल्ली वहतूक पोलिसांनी सीमावर्ती भागांभोवती व्यावसायिक आणि खाजगी वाहनांसाठी वाहतूकीत बदल केला आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि शक्यतो आंदोलनाच्या मार्गावर वाहने घेऊन न जाण्याचे अवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी या आधीही दिल्ली येथे आंदोलन केले आहे. त्या आंदोलनाकडे जगभरातील अनेक देशांतील विचारवंत, शेतकरी नेते, अभ्यासक, संस्था आणि नागरिकांचे लक्ष लागले होते. आताही शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.