Amit Shah Discharged from AIIMS: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची Post Covid Care मध्ये प्रकृती सुधारल्यानंतर दिल्लीच्या एम्स मधून सुट्टी

Amit Shah | (Photo courtesy: amitshah.co.in)

भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)  यांना आज (31 ऑगस्ट) दिल्लीच्या एम्स रूग्णालयामधून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान पोस्ट कोविड केअर (Post Covid Care) साठी त्यांना 18 ऑगस्ट दिवशी All India Institute of Medical Sciences रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

अमित शाह यांनी कोविड वर 14 ऑगस्ट दिवशी मात केल्यानंतर त्यांना मेदांता रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा अंगदुखी आणि थकवा जाणवत असल्याने 18 ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा आहे. शनिवार, 29 ऑगस्ट दिवशी त्यांची प्रकृती सुधारली असून लवकरच डिस्चार्ज दिला जाईल असं सांगण्यात आले होते.

ANI Tweet

दरम्यान 55 वर्षीय अमित शाह यांना 2 ऑगस्ट दिवशी कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर गुरुग्राममध्ये त्यांच्यावर उपचार झाले. दरम्यान त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता होती मात्र अमित शाह यांनी या आजारपणावर मात केली आहे. 15 ऑगस्ट दिवशी त्यांनी निवासस्थानी भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन देखील साजरा केला होता.

केंद्रीय मंत्रिमंडळातील अमित शहा हे पहिले कोरोनाबाधित रूग्ण होते. त्यांच्यानंतर 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले, सध्या भारताचे आयुष मंत्री श्रीपाद नाईक देखील गोवा मध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत.