दिल्ली: 26 जानेवारीच्या लाल किल्लावरील धुडघूस प्रकरणी आरोपी पंजाबी अभिनेता Deep Sidhu ला अटक; Delhi Police Special Cell ची कारवाई

मात्र तो 26 जानेवारी पासून फरार होता.

Deep Sidhu (Photo Credits: Twitter)

दिल्ली मध्ये शेतकरी आंदोलनाच्या 26 जानेवारी 2021 दिवशी आयोजित ट्रॅक्टर रॅली मध्ये धुडसून घालण्याचा आरोप असलेला अभिनेता आणि आंदोलक दीप सिंधू (Actor Deep Sidhu) याला अटक झाली आहे. त्याला नेमकी कुठून अटक करण्यात आली आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र मागील 14 दिवसांपासून तो दिल्ली पोलिसांच्या रडारवर होता. आता अखेर दिल्ली विशेष पोलिसांनी (Delhi Police Special Cell) दिलेल्या माहितीनुसार दीप सिंधूला अटक करण्यात आली आहे. 26 जानेवारीला शेतकरी शांतपणे आणि नेमून दिलेल्या मार्गावरून ट्रॅक्टर रॅली काढणं अपेक्षित होते. मात्र अचानक काही जण बॅरिकेटिंग तोडत थेट लाल किल्ल्यावर पोहचले आणि तेथे त्यांनी तिरंग्याच्या बाजूला दोन- तीन आपले स्वतःचे झेंडे फडकवले आणि काही तास दिल्लीत अराजकतेचे वातावरण बघायला मिळालं होतं.

दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडवणं, रस्त्यात सार्वजनिक वस्तूंची नासधूस करत पुढे जाणार्‍यांमध्ये दीप सिंधूचा देखील समावेश होता. मात्र तो 26 जानेवारी पासून गायब होता. तो पोलिसांना सापडत नसला तरीही तो फेसबूकवर काही पोस्ट टाकत होता. सोशल मीडीयावर अ‍ॅक्टिव्ह असून देखील पोलिस त्याला शोधू कसे शकत नाहीत? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता पण अखेर आज त्याला बेड्या ठोकण्यात आला आहे. दरम्यान ANIने दिलेल्या माहितीनुसार दीप सिद्धूला त्याची एक अभिनेत्री मैत्रिण मदत करत होती. ती अमेरिकेत कॅलिफॉर्निया मध्ये राहते. दीप तिला व्हिडिओ बनवून पाठवत असे आणि ती व्हिडिओ फेसबूक वर अपलोड करत होती अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.   दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धू ची माहिती देणार्‍याला  1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. Red Fort Violence: Deep Sidhu सोबत कोणताही संबंध नाही, Sunny Deol सह काही शेतकरी नेत्यांनी केलं स्पष्ट.

शेतकरी आंदोलकांनी मात्र त्याचा आमच्या शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दीप सिंधूचे काही फोटो थेट मोदींपासून काही भाजपा नेते, कार्यकर्त्यांसोबतही दिसले होते. त्यामुळे त्याच्या आंदोलनातील सहभागावर आणि पुढील हिंसाचारातील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत.