ओडिशा: रस्ते अपघातात बकरीचा मृत्यू पण कंपनीला कोट्यावधीचा फटका, वाचा सविस्तर
मात्र बकरीच्या मृत्यूमुळे एमसीएल (MCL) कंपनीला जबरदस्त फटका बसला असून त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत सरकारला टॅक्सच्या रुपात मिळारी रक्कम ही या अपघातामुळे बुडाली आहे.
ओडिशा (Odisha) येथे रस्ते अपघातात एका बकरीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र बकरीच्या मृत्यूमुळे एमसीएल (MCL) कंपनीला जबरदस्त फटका बसला असून त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत सरकारला टॅक्सच्या रुपात मिळारी रक्कम ही या अपघातामुळे बुडाली आहे. असे नेमके काय प्रकरण आहे की, जेणेकरुन एमसीएल कंपनी आणि सरकारचे नुकसान झाले आहे.
खरतर तालचेर कोळसा क्षेत्रात सोमवारी कोळसा वाहून नेत असलेल्या डंपरची धडक रस्त्यावरुन जाणाऱ्या एका बकरीला लागली. यामध्ये बकरीचा तेथेच मृत्यू झाला. या प्रकारानंतर स्थानिकांनी आंदोलन करत 60 हजार रुपये देण्याची मागणी सकाळी 11 वाजल्यापासून सुरु करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केला मात्र त्यांना न जुमानता स्थानिकांनी आंदोलन सुरु ठेवले. पण जवळजवळ साडेतीस तासानंतर कोळसाची धुलाई सुरु करण्यात आली.(उन्हात अंडरवेयर वाळत घालणे पडले महाग,सामाजिक कार्यकर्ते मास्टर विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल)
मात्र स्थानिकांच्या काम बंद आंदोलनामुळे महानदी कोलफिल्ड्स लिमिटिडेट कंपनीला तब्बल 2.68 कोट्यावधीचा चुना लावण्यात आला. या प्रकरणी अद्याप अधिक तपास पोलिसांकडून केला जात असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तर सकारला टॅक्स रुपात मिळणाऱ्या 46 लाख रुपयांचे ही नुकसान झाले आहे. फक्त हजार रुपयांच्या बकरीच्या किंमतीसाठी कंपनीला चक्क कोट्यावधी रुपये द्यावे लागल्याची बातमी सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
कंपनीने या प्रकरणी दिलेल्या विधानात असे म्हटले आहे की, अपघात झालेल्या घटनास्थळी फक्त कंपनीतील अधिकृत व्यक्तींनाच परवानगी दिली जाते. मात्र स्थानिक नागरिक या ठिकाणा मुद्दामुन रस्त्यावर पडणाऱ्या कोळशाचे तुकडे उचण्यासाठी येत असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत या ठिकाणी गुरे चरण्यासाठी सुद्धा आणली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.