गोरखपूर: टीव्ही मालिका पाहण्याच्या नादात शिळं अन्न खायला घालणा-या सासूला सूनेने घडवली अद्दल, फोन करुन पोलिसांना बोलावले घरी

त्यानंतर त्या दोघींची समजून काढून त्यांना कडक शब्दांत समज दिली. तसेच असा प्रकार पुन्हा घडला तर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

Representative Image (Photo Credits: Pixabay)

एकाच घरात सासू-सून (Mother in Law and Daughter in Law) गुण्या-गोविंदाने राहतायत अशी घरी फार कमी पाहायला मिळतात. जेवणावरुन, राहणीमानावरुन, वागणुकीवरुन काही ना काही कारणावरुन भांड्याला भांडं वाजतच असते. असे असताना चक्क सासू बाईच्या टीव्ही मालिका पाहण्याच्या नादाला कंटाळून सूनेने चक्क घरात पोलिस बोलावण्याचे ऐकले आहे का? मात्र असं घडलय गोरखपूर मध्ये. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर (Gorkhpur) भागात राहणा-या एका सूनेने सासू टीव्ही मालिका पाहण्याच्या नादात शिळं अन्न खायला घालणा-या सासूला चांगलीच अद्दल घडवली आहे. तिने 112 नंबर पोलिसांना कॉल करुन त्यांना घरी बोलावून घेतले.

हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलि तात्काळ त्या सूनेच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्या दोघींची समजून काढून त्यांना कडक शब्दांत समज दिली. तसेच असा प्रकार पुन्हा घडला तर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले.हेदेखील वाचा- Man Slapped Mother: मुलाची कानाखाली वर्मी लागली, आईचा जागीच मृत्यू (Video)

नेमकं काय आहे प्रकरण?

गोरखपूरच्या गगहा ठाणे क्षेत्रात मंझगाव मध्ये या सासू-सून एकत्र राहत होते. या दोघांचे पती कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने या दोघीच घरी असायच्या. सासू आपल्याला टीव्ही मालिका पाहण्याच्या नादात वारंवार शिळं अन्न खायला घालते ही गोष्ट सूनेच्या लक्षात येताच तिने 112 नंबरवर कॉल करुन पोलिसांना बोलावून घेतले. सासूच्या शिळ्या अन्नामुळे आपले तब्येत बिघडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सासू पूर्ण दिवस केवळ टीव्ही पाहत असते. त्यामुळे जेवण बनविण्यास सांगितले तर ती नकार द्यायची असे सूनेने पोलिसांना सांगितले.

थोडक्यात सासू-सूनेची भांडण आता कोणतं टोकं गाठू लागलं आहे ते यावरून कळतं. मिडिया रिपोर्टनुसार, ही सून नवीनच लग्न करुन या घरात आली होती. मात्र सासूच्या या सततच्या टिव्ही बघण्याच्या प्रकाराला ती फार कंटाळली होती.