Dailyhunt, OneIndia आणि Delhi Police यांच्या एकत्र भागिदारीतून Public Safety सुधारण्याच्या दृष्टीने पाऊल; पहा नेमकं काय करणार

सोबतच महिला सुरक्षा, ड्र्ग्स अब्युज अवेअरनेस निर्माण करणार आहेत.

(Left to Right) Soumya Menon, Ravanan N, Sanjay Singh, Suman Nalwa at partnership signing ceremony in Delhi (Photo Credits: File Image)

भारतामधील पहिल्या क्रमांकाचं language content discovery platform, Dailyhunt आणि प्रादेशिक भाषांमधील डिजिटल पोर्टल OneIndia यांनी दिल्ली पोलिसांसोबत एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप जाहीर केली आहे. 2 वर्षांच्या या कोलॅब्रेशन मध्ये Dailyhunt आणि OneIndia दिल्ली पोलिसांच्या मदतीने सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती करणार आहे. सोबतच महिला सुरक्षा, ड्र्ग्स अब्युज अवेअरनेस निर्माण करणार आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडीत महत्त्वाची माहिती नागरिकांना योग्य प्रकारे देणं हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. डेलीहंट आपल्या प्लॅटफॉर्मवर दिल्ली पोलिसांचे प्रोफाईल लॉन्च करेल आणि व्हिडीओज, शेअर कार्ड्स, लिस्टिकल्स, लाइव्ह स्ट्रीम जारी करणार आहे. यामुळे जनतेला प्रामुख्याने तरूणांना माहिती मिळत राहणार आहे. नक्की वाचा: Cyber Crime Alert: OTP ला कॉल द्वाराही चोरलं जाऊ शकतं; पहा कसा टाळाल 'हा' धोका!

OneIndia वर, संबंधित विषयांशी संबंधित लेख, इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओ एकापेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये जारी केले जातील. यामुळे प्रादेशिक प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचता येणार आहे. या प्रयत्नांद्वारे, दिल्ली पोलिस समुदायाशी संवाद वाढवतील, जागरूकता निर्माण करतील आणि विविध प्रेक्षक वर्गातील महत्त्वाच्या विषयांवर अर्थपूर्ण चर्चा होतील.

Ravanan N, Executive Director, Eterno Infotech यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमच्या प्लॅटफॉर्मवर दिल्ली पोलीस असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही आमचे सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत. एकत्रितपणे, आम्ही दिल्ली पोलिस आणि समाजाचे संबंध मजबूत करणे आणि लोकशाहीकरण करण्याचे आमचे ध्येय आहे.

Ms. Suman Nalwa, DCP, PRO, Delhi Police यांनी प्रतिक्रिया देताना "या भागीदारीद्वारे, आमचा उद्देश नागरिकांशी, विशेषत: तरुण पिढीशी दिल्ली पोलिसांचा सहभाग मजबूत करणे हा आहे असं म्हटलं आहे. डेलीहंट आणि वनइंडियाच्या युजर्सच्या आधारे, आम्ही नाविन्यपूर्ण सहभाग शोधण्याची अपेक्षा करतो आहे. फॉरमॅट, प्रभावी संदेश पोहचवण्यासाठी आणि आमचा डिजिटल प्रेझेंस मजबूत होईल. आम्हाला विश्वास आहे की या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्मच्या समर्थनामुळे आम्ही महत्त्वपूर्ण माहितीपर्यंत अखंडपणे प्रवेश सुलभ करू आणि विविध प्रेक्षकांमध्ये अर्थपूर्ण चर्चांना प्रोत्साहन देऊ.

डेलिहंट

डेलिहंट हा देशातील पहिल्या क्रमांकाचा language content platform आहे. 15 भाषांमध्ये त्यांचा दिवसाचा 1 मिलियन पेक्षा अधिकचा रिच आहे. 50 हजार पेक्षा अधिक क्रिएटर्सच्या इकोसिस्टमचा त्यामध्ये सहभाग आहे.

Oneindia

वन इंडिया हे बहुभाषिक न्यूज पोर्टल आहे. 2006 मध्ये त्याची स्थापना झाली. लोकांना त्यांच्या मातृभाषेसोबत जोडून ठेवण्यासाठी या पोर्टलची सुरूवात झाली. हिंदी, मराठी, तेलगू, गुजराती, ओडिया सह 11 विविध भाषांमध्ये हे पोर्टल उपलब्ध आहे.