Cyclone Vayu गुजरातच्या दिशेने, उद्या मुंबईत धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज
तर या वाय त्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणात 11 ते 14 जून दरम्यान ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याने येत्या पुढील 24 तासात राज्यातील पावसाची स्थिती कशी असणार आहे याबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. तर अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाब असलेल्या क्षेत्राचे रुपांतर तीव्र दाबात झाल्याने सायक्लॉन वायूची (Cyclone Vayu ) गती अधिक वाढली आहे. त्यामुळे केरळ (Kerala) आणि कर्नाटकच्या (Karnataka) समुद्र किनाऱ्यावर पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मच्छिमारांनी 13 जून पर्यंत समुद्रात न जण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आहे.
तर सायक्लोन वायू आता अरबी समुद्रातून पश्चिम किनारपट्टीवरुन गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. तर या वाय त्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणात 11 ते 14 जून दरम्यान ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता उद्या सकाळी मुंबईतसुद्धा सायक्लोन वायू धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मात्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आज 65 ते 75 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातसुद्धा विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.