IPL Auction 2025 Live

Cyclone Tej Update: तेज चक्रीवादळ रौद्र रुप धारण करण्याची शक्यता, IMD ने दिला इशारा

या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) सावधानतेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत किनारपट्टीच्या प्रदेशांवर चक्रीवादळाचा विशेष प्रभाव जाणवतो.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

Cyclone Tej in Arabian Sea: अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ हळूहळू रौद्र रुप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) सावधानतेचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत किनारपट्टीच्या प्रदेशांवर चक्रीवादळाचा विशेष प्रभाव जाणवतो. हे वादळ रविवारपर्यंत (22 ऑक्टोबर) ते अतिशय तीव्र चक्रीवादळ (VSCS) मध्ये परावर्तीत होण्याचा अंदाज आहे. 21 ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात तेज चक्रीवादळाची निर्मिती दिसून आली. ज्याची ताकद वाढत आहे. आयएमडीच्या ताज्या माहितीनुसार, वादळाचे स्थान, येमेनच्या सोकोत्रापासून 330 किमी पूर्वेस आणि सलालाह, ओमानपासून अंदाजे 690 किमी अंतरावर आहे. ते विकसित होत असताना, चक्रीवादळ तेज सध्या येमेनच्या अल घैदापासून 720 किलोमीटर आग्नेयेकडे केंद्रित होत आहे. 22 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत वादळ आणखी तीव्र होऊन व्हीएससीएसमध्ये बदलेल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

तेज चक्रीवादळ 25 ऑक्टोबरच्या पहाटे अल घैदाह, येमेन आणि सलालाह, ओमानच्या दरम्यान मार्गक्रमण करेल अशी अपेक्षा आहे. शिवाय, IMD ने पुढील 24 तासांमध्ये त्याचे रुपांतर अधिक शक्तीशाली वादळात होऊ शकते. IMD ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, पश्चिम-मध्य प्रदेशात असलेल्या बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 PM पर्यंत ही प्रणाली पारादीप, ओडिशापासून अंदाजे 620 किमी, दिघा, पश्चिम बंगालच्या दक्षिणेस 780 किमी आणि बांगलादेशच्या खेपुपारा येथून 900 किमी नैऋत्येस पाहायला मिळते आहे.

IMD ने आग्नेय आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राबाबत सूचना जारी केल्या होत्या. ज्याचे रविवारपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओमान आणि येमेनच्या दक्षिणेकडील किनार्‍याकडे उत्तर-वायव्य मार्ग कायम ठेवण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे संभाव्य परिणामांबद्दल चिंता वाढली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात तेज चक्रीवादळ अधिक धोकादायक असू शकते. पुढील 24 तासांत त्याचे रूपांतर रौद्र वादळात होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे. विभागाने याला व्हीएससीएस म्हणजेच अति तीव्र चक्रीवादळ असे म्हटले आहे. हवामान खात्याने यापूर्वी सांगितले होते की तेज चक्रीवादळ 21 ऑक्टोबर रोजी IST 2330 वाजता सोकोत्रा (येमेन) च्या 330 किमी पूर्वेस, सलालाह (ओमान) च्या 690 किमी आग्नेय आणि अल कायदा (येमेन) च्या 720 किमी अंतरावर नैऋत्य अरबी समुद्रावर आले. आता हे वादळ 22 ऑक्‍टोबरच्या सकाळी अतिशय तीव्र चक्री वादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.