Cyclone Tauktae मुळे दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा IMD चा इशारा

16 मे पर्यंत हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीला धडकू शकते. या चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि गोवामध्ये मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

Cyclone (Photo Credits: Wikimedia Commons)

अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादाळाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवला आहे. 16 मे पर्यंत हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीला धडकू शकते. या चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण (South Konkan) आणि गोवा (Goa) मध्ये मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. अरबी समुद्राच्या आग्नेन दिशेला लक्ष्यदिव्य बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. शुक्रवार पर्यंत याची तीव्रता अधिक वाढू शकते. शनिवार पर्यंत याची तीव्रता अधिक वाढून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर Tauktae चक्रीवादळ उत्तरेकडील गुजरात आणि पाकिस्तानाच्या दिशेने सरकेल.  18 मे च्या संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ गुजरातला धडकण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर रविवार, 16 मे आणि सोमवार, 17 मे रोजी काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. (Cyclone Tauktae Live Tracker Map: अरबी समुद्रात येणाऱ्या Tauktae चक्रीवादळाचा नेमका मार्ग, वेग, ठिकाण कसे पाहाल?)

पहिल्या 24 तासांत 64.5mm ते 115.5mm इतका पाऊस पडू शकतो. तर पुढच्या 24 तासांत 115.6mm ते 204.4mm इतका पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादाळामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यासोबतच 17 मे पर्यंत गुजरात मध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि राजस्थानच्या काही भागात 18 व 19 मे रोजी मध्य ते मुसळधार पाऊस पडू शकतो. या पावसासोबत 50 ते 80 किमी प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची देखील शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif