Cyclone Fani Updates: फनी वादळ ओडीसा राज्यातील गोपाळपूर, चांदबळीपर्यंत पोहोचले, नागरिकांच्या मतदीसाठी बचाव पथक सज्ज, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष ट्रेन तैनात, 100 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द
संभाव्य धोका ध्यानात घेून ईस्ट कोस्ट रेल्वेने सुमारे 22 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 103 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण-दक्षिणपूर्व विशाखापट्टनम येथे सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी फनी वादळाचे संकेत मिळाले. हे वादळ प्रति तास 235 वेगाने धावत असल्याची माहिती आहे.
हवामान विभागाने ओडिसा (Odisha) राज्याला फनी वादळाचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. फनी वादळ ( Cyclone Fani) आणि त्याचा संभाव्य धोका ध्यानात घेऊन ओडिसा सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व शाळा, महाविद्यालयांना पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, फनी वादळाचा तडाखा बसल्यास कराव्या लागणाऱ्या संभाव्य मदतीसाठी बाचव पथक तैनात आहे. राज्याचा आपत्तीनिवारण विभागही जोरदार कार्यरत झाला आहे. पर्यटकांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यासाएठी विशेष ट्रेन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तर, काही 100 हून अधिक ट्रेन रद्द केल्या आहेत.
आपत्तीदरम्यान सेवा पुरवणारी ओडीसा सरकारचा विभाग आवश्यक त्या सर्व यंत्रसामग्रीने तयार आहे. शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर 6-6 सदस्यांचे एक अशी एकूण 50 पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूक मतदानास स्थगिती द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (हेही वाचा, फनी चक्रीवादळ 'दक्षिण बंगाल'च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा)
एएनआय ट्विट
पर्यटकांनाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन तयार ठेवल्या आहेत. या ट्रेनपैकी पहिली ट्रेन आज (गुरुवार, 2 मे 2019) दुपारी 12 वाजता पुरी येथून निघणार आहे. तर, दुसरी आणि तिसरी ट्रेन हावडा येथून दुपारी 3 आणि् सायंकाळी 6 वाजता निघणार आहे.
एएनआय ट्विट
फनी चक्रीवादळाचा तडाखा ओडीसा राज्यासह उत्तर पश्चिमेकडील राज्यांनाही बसण्याची चिन्हे आहे. संभाव्य धोका ध्यानात घेून ईस्ट कोस्ट रेल्वेने सुमारे 22 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 103 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण-दक्षिणपूर्व विशाखापट्टनम येथे सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी फनी वादळाचे संकेत मिळाले. हे वादळ प्रति तास 235 वेगाने धावत असल्याची माहिती आहे.