Cyclone Amphan: चक्रीवादळ 'अम्फान'चा कहर, कोलकाता विमानतळाचा एक भाग पाण्याखाली, पहा व्हिडिओ

मात्र याचा सर्वाधिक फटका बंगालला बसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्शातील फोटो आणि व्हिडिओ आज सातत्याने समोर येत आहेत. बंगाल मध्ये अम्फान चक्रीवादळामुळे 12 जणांनी जीव गमावला आहे.

कोलकाता विमानतळ (Photo Credits-ANI Twitter)

चक्रीवादळ 'अम्फान' ने (Cyclone Amphan) पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे थैमान घातले असून सर्वकाही उद्धवस्त केले आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका बंगालला बसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्शातील फोटो आणि व्हिडिओ आज सातत्याने समोर येत आहेत. बंगाल मध्ये अम्फान चक्रीवादळामुळे 12 जणांनी जीव गमावला आहे. तर काही ठिकाणी झाडे उकटली गेली असून तुफान पावसामुळे पाणी भरल्याचे ही दिसून आले आहे. तसेच हजारोंच्या संख्येने घर जमिनदोस्त झाली आहेत. बंगालच्या खाडीत आलेल्या चक्रीवादळामुळे बुधवारी मुसळधार पाऊस पडला. याच कारणास्तव कोलकाता विमानतळाचा (Kolkata Airport) एक भाग पाण्याखाली गेला आहे. चक्रीवादळ अम्फान मुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळावरील सर्व ऑपरेशन गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत बंद होते, जे अद्यापही बंद आहे.

एनआय यांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता विमानतळाचा एक भाग पाण्याने पूर्णपणे भरला गेला आहे. कोलाकाता विमानतळावर उभी असलेली विमाने सुद्धा अम्फानच्या जाळ्यात अडकली गेली आहेत. तुफान पावसामुळे संपूर्ण विमानतळ जलमय झाल्याचे दिसून येत आहे. तर खाली दिलेल्या व्हिडिओत तुम्हाला चक्रीवादळाने कशा पद्धतीने नुकसान केले आहे ते पाहता येणार आहे.(Amphan Cyclone Update: अम्फान चक्रिवादळाचा वेग वाढला; ओडिशामध्ये वेगवान वारे, किनारपट्टीवरील तीन लाख नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हालवलं)

कोलकाता मध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळामुले लहान झोपट्या पडल्या आहेत. रस्त्यावर झाडे तुटून पडली आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी झाडे कापून रस्ते मोकळे करत आहेत.

दरम्यान, राज्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, अम्फान चक्रीवादळामुळे झालेली जीवितहानी आणि मालमेत्तेच्या नुकासीचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसून नुकसान झाले आहे त्या ठिकाणी जाणे सध्या मुश्किल आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण भागातील 24 जिल्ह्यात अम्फान चक्रीवादळामुळे पाऊस आणि वादळामुळे घरांचा वरचा भाग तुफान वाऱ्यामुळे उडाला आहे. तसेच काही ठिकाणी झाडांसह विजेचे खांब सुद्धा पडले आहे. ऐवढेच नाही तर खेड्यांसह सखल भागात पाणी भरल्याचे सांगण्यात येत आहे.