Hyderabad Encounter: स्वसंरक्षणातून एनकाऊंटर; सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांची माहिती

हैदराबादमध्ये झालेल्या डॉक्टर तरूणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आज पोलिसांकडून एका एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला आहे.

Hyderabad rape case crime spot and Cyberabad CP VC Sajjanar. (Photo Credit: ANI)

 Telangana Vet Rape-Murder Case:  काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या डॉक्टर तरूणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आज पोलिसांकडून एका एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला आहे. या घटनास्थळीच आज सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार (Cyberabad CP VC Sajjanar) यांनी पत्रकार परिषद घेऊन सारा घटनाक्रम सांगितला आहे. दरम्यान पोलिसांनी स्व संरक्षणातून चारही आरोपींवर गोळीबार केल्याचं म्हटलं आहे. पीडीतेचा मोबाईल आणि इतर वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिस आरोपींना घेऊन घटनास्थानी आले होते. मात्र आरोपींनी दगड, धारदार वस्तूंचा मारा केल्याने पोलिसांना प्रत्युत्तर द्यावं लागलं असं सज्जानार म्हणाले आहेत. पोक्सोअंतर्गत दोषींना दया नकोच- राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

 दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळेस 10 पोलिस होते. तर आरोपी पोलिस कोठडीमध्ये होते. मात्र या दरम्यान आज आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि त्याच घटनास्थळी पोलिसांनी आरोपींचा खात्मा केला. यामध्ये पोलिसांच्याही डोक्याला मार लागला आहे. आरोपींपैकी आरिफने  पोलिसांच्या बंदुका हिसकावून त्यांच्यावर हल्ला केला असे आरोप पोलिसांनी लावले आहेत. तसेच पीडीतेच्या नावाची बदमानी टाळा, पीडितेच्या कुटुंबाला त्रास देऊ  नका. त्यांच्या प्रायव्हसीचा आदर राखा असे आवाहनदेखील व्ही. सी. सज्जनार यांची पत्रकार परिषदेत केले आहे.   Hyderabad Rape and Murder Case:आरोपींच्या एन्काऊंटवर अभिनेते अनुपम खेर, ऋषी कपूर यांच्यासह 4 कलाकारांनी व्यक्त केल्या सोशल मीडीयावर आपल्या प्रतिक्रिया!

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे सध्या समाजात संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. काहींनी त्याचे समर्थन केले आहे. तर काहींनी एन्काऊंटर करून आरोपींना संपावणं हा कुठचा न्याय? असा प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे.हैदराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपींची डीएनए टेस्ट होईल त्यानंतर मृतदेह परिवाराच्या ताब्यात दिले जाणार आहेत.