Nokri.Com वर रिझ्युम अपलोड करणे पडले महाग; तरुणाला 16.64 लाखांचा गंडा
नोएडा (Noida) मधील सरदारपूर येथील रहिवाशी चंदन कुमार (Chandan Kumar) याला नोकरीच्या शोधात असताना सायबर क्राईमच्या (Cyber Crime0 माध्यमातून तब्बल 16.64 लाखांचा गंडा घातल्याचे समजत आहे.याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नोएडा (Noida) मधील सरदारपूर येथील रहिवाशी चंदन कुमार (Chandan Kumar) याला नोकरीच्या शोधात असताना सायबर क्राईमच्या (Cyber Crime) माध्यमातून तब्बल 16.64 लाखांचा गंडा घातल्याचे समजत आहे. चंदन याने मागील वर्षी जुलै महिन्यात नोकरी. कॉम (nokri.com) या प्रसिद्ध वेबसाईटवर आपला रिझ्युम अपलोड केला होता,यातून चंदनची वैयक्तिक माहिती जाणून घेऊन काही भामट्यांनी त्याला लुबाडण्याचा कट आखला आणि त्यानुसार सर्वप्रथम देशात व नंतर कॅनडा मध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नोएडा पोलीस स्थानकात अनूप गुप्ता, राजेंद्र सिंह शेखावत, गौरव, सुभाष खन्ना, आदित्य आणि विवेक अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चंदन कुमार यांनी आपला रिझ्युम अपलोड करताच एका महिन्यानंतर त्याला अनुप गुप्ता या इसमाने कॉल केला. अनुपने आपण जॉब पोर्तकच कर्मचारी असल्याचे सांगून एक आयटी कंपनीतील नोकरीसाठी चंदनची मुलखात सुद्धा घेतली. यावेळेस प्रोसेसिंग फीच्या नावाखाली त्याच्याकडून एक लाख रुपये घेण्यात आले. यानंतर काहीच दिवसात राजेंद्र शेखावत याने चंदनला कॉल करून आपण कंपनीच्या एचआर विभागातून बोलत असल्याचे सांगितले, जॉइनिंग फी म्हणून राजेंद्रने सुद्धा 25 हजार रुपये मागितले, यावेळी चंदनला शंका आल्याने त्याने विरोध केला पण यावर राजेंद्रने परदेशात नोकरीचे गाजर दाखवून त्याला भुलवले, इतकेच नव्हे तर तिकीट आणि व्हिसाच्या नावाखाली आणखी 70 हजार रुपये मागून घेतले.
याच प्रमाणे हळूहळू एकाएकाने चंदन कडून पैसे घेतले, शेवटी कॅनडात जॉब देण्याच्या नावाखाली तिथे सोय करतो असे सांगून 15 लाख रुपये घेतले आणि मग चंदन सोबत यापैकी कोणाचाच संपर्क झाला नाही. धक्कादायक! बेडरूममधील स्मार्ट टीव्ही हॅक; पती पत्नीमधील नाजूक क्षणांचा व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाल्याने उडाली खळबळ
दरम्यान सर्वांचे फोन बंद असल्याने चंदन ला आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे अखेरीस उमगले आणि त्याने थेट पोलिसांकडे धाव घेतली. तूर्तास पोलीस याप्रकरणी तपास करत असून या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)