CRPF Recruitment: सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबलची बंपर भरती; तब्बल 1.30 लाख पदांची होणार नियुक्ती, जाणून घ्या सविस्तर
या पदांसाठी प्रोबेशन कालावधी 2 वर्षांचा असेल आणि या दरम्यान त्यांना वेतन मॅट्रिक्सनुसार 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल. अर्ज सुरू होण्याच्या तारखांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
लवकरच सीआरपीएफ (CRPF) मध्ये बंपर भरती होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे, कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या एकूण 1.30 लाख पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. गृह मंत्रालयाने या संदर्भात नोटीस जारी केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरली जातील.
मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, कॉन्स्टेबलच्या एकूण 1,29,929 पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी 1,25,262 पदे पुरुष उमेदवारांसाठी तर 4467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. यासोबतच माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कॉन्स्टेबल पदावर माजी अग्निवीर यांचीही नियुक्ती केली जाईल.
Ministry of Home Affairs has issued a notification regarding recruitment for around 1.30 lakh posts of constables in CRPF pic.twitter.com/XgyaOzj9GL
— ANI (@ANI) April 6, 2023
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे. त्यांच्या वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. तपशीलवार माहिती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मिळू शकते. या पदांसाठी उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील टप्प्यासाठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच ते परीक्षेच्या पुढील टप्प्यात प्रवेश करू शकतात. (हेही वाचा: Largest Layoff 2023: केवळ 'Amazon', 'Google', 'मायक्रोसॉफ्ट'च नव्हे 'गोल्डमन सॅक्स', 'कॉईनबेस', 'झूम' यांसारख्या कंपन्यांनीही केली कर्माचरी कपात; जाणून घ्या टक्केवारीसह जागतिक आकडेवारी)
या पदांसाठी प्रोबेशन कालावधी 2 वर्षांचा असेल आणि या दरम्यान त्यांना वेतन मॅट्रिक्सनुसार 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळेल. अर्ज सुरू होण्याच्या तारखांबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सविस्तर नोटीस लवकरच प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. कोणत्याही विषयावर तपशीलवार अधिक नवीनतम अद्यतने मिळविण्यासाठी वेळोवेळी सीरपीएफची crpf.gov.in.ची अधिकृत वेबसाइट तपासत रहा.
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2023 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

