Cross-Gender Massages in Spa and Massage Centres: स्पा आणि मसाज सेंटरमधील क्रॉस-जेंडर मालिश राहणार सुरु; हायकोर्टाने फेटाळली याचिका
अशा प्रकारच्या मसाजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
स्पा (Spa) आणि मसाज सेंटरमद्ये क्रॉस जेंडर (Spa and Massage Centres) मालिश सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा प्रकारच्या मसाजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत पीएस अरोरा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावताना नमूद केले की, उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने 18 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या दिल्लीतील स्पा/मसाज सेंटर्सच्या (Cross-Gender Massages in Spa and Massage Centres ) संचालनासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांची वैधता या प्रकरणाची आधीच दखल घेतली आहे.
कोर्टाने म्हटले की, एकल न्यायाधीश या प्रकरणात आगोरच वादात अडल्याने, या न्यायालयाचे असे मत आहे की सध्याच्या जनहित (दावा) विचारात घेतले जाऊ शकत नाही. त्यानुसार, सध्याची याचिका फेटाळली जाते," असे खंडपीठाने म्हटले आहे. फेटाळलेल्या याचिकेत, याचिकाकर्त्याने कोर्टाला स्पा आणि मसाज केंद्रांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग नियमितपणे दिल्ली महिला आयोगाशी सामायिक करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती. (हेही वाचा, Prostitution Racket At Spa in Vashi Mall: नवी मुंबई मध्ये स्पा सेंटर खाली वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणार्या महिलेला अटक)
याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, दिल्ली सरकारने जारी केलेल्या 18 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून राष्ट्रीय राजधानीत अशा विविध सुविधांमध्ये क्रॉस-जेंडर मसाज केले जात आहेत. त्यांनी दावा केला की बंद खोल्यांमध्ये मसाज केले जात आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे ज्यामुळे वेश्याव्यवसाय वाढला आहे. करोलबागमधील बेकायदेशीर स्पा चालवण्याबाबत त्यांनी पोलिसांकडे अनेक तक्रारी आणि निवेदने केली, पण प्रतिसाद मिळाला नाही, असेही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले.
दरम्यान, न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने डिसेंबर 2021 मध्ये शहरातील महानगरपालिका आणि दिल्ली पोलिसांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, वैध परवान्याशिवाय स्पा चालविण्यास परवानगी दिली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही म्हटले होते. पोलिसांनी सर्व परवानाधारक स्पाची तपासणी करण्यास सांगितले होते आणि जर ते कोणत्याही बेकायदेशीर कामात गुंतलेले आढळले तर त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, असे स्पष्ट आदेश आधीच दिले होते.
मसाज करण्याचे अनेक फायदे आहेत. पण, चुकीच्या किंवा अयोग्य पद्धतीने केलेला मसाज अनेकदा हानिकारकही ठरू शकतो. मसाज हा भारतीय समाजव्यवस्थेत अनादी काळापासून प्रचलित आहे. अलिकडील काही काळात व्यावसायिक मसाज सेंटर तयार झाली आहेत. छोटी-मोठ्या शहरांमधून अशी सेंटर्स पाहायला मिळतात. अलिकडील काही काळात मसाज सेंटर्समध्ये अवैध बाबी चालत असल्याच्या तक्रारीही केल्या जातात.