COVID19: सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण- PTI
यामुळे आता देशातील सर्वोच्च न्यायालयीन कामकाजाच्या इमारतीत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजत आहे.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) एका कर्मचार्याला कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता देशातील सर्वोच्च न्यायालयीन कामकाजाच्या इमारतीत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजत आहे. सुप्रीम कोर्टात काम करणारा हा कर्मचारी 16 एप्रिल रोजी ऑन ड्युटी होता. कामावर आल्यानंतर त्याला दोन दिवस ताप आला, यामुळे त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यावेळी मधल्या काळात त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या चांचणी निकाल पॉझिटिव्ह आल्याने या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोरोनाशी संबंधित लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने 23 मार्चपासून आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता यावेळी लॉक डाऊनचे पालन करत अत्यंत महत्वाच्या खटल्यांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू आहे. याच कामासाठी हा कर्मचारी कोर्टात 16 एप्रिल रोजी आला होता. त्यावेळेस त्याला कोरोनाची लागण होती की नाही याचे पुष्टी झालेली नाही मात्र तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन न्यायाधीशांना सुद्धा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. Coronavirus Update: भारतात 1543 नवे COVID-19 रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,435
PTI ट्विट
दरम्यान, दिल्लीमध्ये आज निती आयोग इमारतीमध्ये सुद्धा एक डिरेक्टर लेव्हलचा ऑफिसर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. खबरदारीचा पर्याय म्ह्णून ही इमारत पुढील 48 तासांसाठी सील करण्यात आली आहे. नीति आयोगाची इमारत सॅनिटाइज करत पुढील दोन दिवसांसाठी सील करण्यात आली आहे. त्याचसोबत आवश्यक त्या प्रोटोकॉलचे पालन सुद्धा केले जात आहे.