Covid19 Guidelines To Indian Army: कोरोनाच्या पार्श्वभुमिवर भारतीय लष्कराकडून विशेष नियमावली जारी, जवानांना देखील मास्क आणि सोशल डिस्टंसिंग संबंधीत विशेष सुचना
भारतीय लष्कराच्या नियमानुसार जवानांना मास्क वापरण्यास सांगितलं आहे. तसेच अधिक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं, सॅनिटायझर वापरणं यासारख्या प्राथमिक सुचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीच्या पार्शवभुमिवर जगभरात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण दिसत आहे. चीन, अमेरीका, जापान, उत्तर कोरीया सारख्या अनेक प्रमुख देशात मोठ्या संख्येने कोरोना विषाणुचा नवा व्हेरियंट आढळून येताना दिसत आहे. तरी भारतात देखील या नव्या व्हेरियंटचे काही संशयित रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी काही विशेष नियम जारी करण्यात आले आहे. सध्या हे नियम सक्तीचे नसलेत तरी जनतेने अधिक गर्दीच्या ठिकाणी भेट जाणं, मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टंसिंग पाळण यासारख्या महत्वपूर्ण सुचना देण्यात आल्या आहेत. तरी कोरोनाच्या पार्श्वभुमिवरचं भारतीय लष्कराकडून भारतीय जवनांसाठी काही विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. तरी या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.
भारतीय लष्कराच्या नियमानुसार जवानांना मास्क वापरण्यास सांगितलं आहे. तसेच अधिक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं, सॅनिटायझर वापरणं यासारख्या प्राथमिक सुचना देण्यात आल्या आहेत. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी कुणालाही कोरोनाची काही लक्षणं जाणवल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (हे ही वाचा:- Covid-19 BF.7 Variant in India: भारतात BF.7 व्हेरियंटचे 4 रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली राज्याच्या आरोग्य मंत्र्याची बैठक)
भारतातचं नाही तर जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकवर काढलं आहे. चीनमध्ये तर कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने हाहाकार माजवला आहे. एवढचं नाही तर या नव्या व्हेरिअंटचे संशयित रुग्ण आता भारतात देखील आढळले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्य सरकारला खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी याच पार्श्वभुमिवर गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा कोरोना महामारी विरोधात पहिलं पाउल म्हणून काही विशेष नियम जारी करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)