कोरोनाच्या BF.7 Variant प्रादुर्भावामुळे नवी चिंता; पुन्हा एकदा 'Work From Home' सुरु होण्याची शक्यता

Work From Home | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus New Variant: कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमुळे अवघे जग मोठ्या संकटात सापडले होते. मात्र, आता हे संकट काहीसे निवळले असले तरी पूर्ण टळले नाही. परिणामी कोरोना व्हायरसचा नवा व्हेरीएंट पुन्हा एकदा डोके वर काढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश आणि अभ्यासकांसह वैद्यकीय आणि जवळपास सर्वच वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. जगभरातील अनेक कंपन्यांनी तर आतापासूनच ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) म्हणजेच घरुन काम करण्याची मुभा देण्यास सुरुवात करावी का? याबाबत विचार सुरु केला आहे. देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण वाढल्याने परिस्थीती जर बदलली तर टुरीझम हॉस्पिटेलिटी, रियल एस्टेट सेक्टर आदींमध्ये 'वर्क फ्रॉम होम' प्रणाली पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आगोदरपासूनच सुरक्षेची पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीन, जापान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थाईलंड आदी देशांमधून प्रवास करुन भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड-19 चाचणी बंधनकारक केली आहे. मिंटच्या हवाल्याने न्यूज 18 हिंदीने दिलेल्यावृत्तात म्हटले आहे की, करिअरनेटचे सीईओ अंशुमान दास यांनी म्हटले की, हॉस्पिटॅलीटी, ऑटोमोबाइल, कमर्शियल ऑफिस, ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्टेशन सेक्टर अधिक अलर्टवर आहेत. (हेही वाचा, वाचा: Work from Home Rule: घरून काम करण्याबद्दल सरकारचा नवा नियम; आता कर्मचारी एक वर्ष करू शकणार वर्क फ्रॉम होम .)

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरीएंट BF.7 आपला प्रादुर्भाव वाढवत असल्याने परिस्थिती अधिकच बिघडत आहे. तर, जापान, दक्षिण कोरिया, ब्राजील आणि अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमितांची संख्या वाढते आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या बातम्या अशा काळात येत आहेत ज्या काळात जागतिक मंदीची चिन्हे पाहायला मिळत आहेत.