Covid 19 Vaccine: DCGI ची आज 11 वाजता पत्रकार परिषद; Covishield, Covaxin लसीकरणाला मान्यता जाहीर होण्याची शक्यता
व्ही. जी सोमाणी दिल्लीमध्ये डीजीसीआय च्या पत्रकार परिषद माहिती देणार आहेत. यामध्ये भारतात कोविड 19 च्या लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली जाऊ शकते.
भारतामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्यांनाच कोरोना लसीची प्रतिक्षा आहे. आज कोविड 19 लसीकरणाबद्दल (Covid 19 Vaccination) महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकते. दुपारी 11 वाजता डीजीसीआय (DGCI) कडून एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. काल पहिल्या भारतीय बनावटीच्या लसीला म्हणजेच कोवॅक्सिनला देखील तज्ञ समितीने मंजुरी दिल्याने आता सार्यांच लसीकरणाची प्रतिक्षा आहे. यापूर्वी सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्डला देखील तज्ञ समितीने मंजुरी देत डीसीजीआय कडे त्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. आज डॉ. व्ही. जी सोमाणी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देणार आहेत. COVID-19 Vaccine Covaxin: नव्या वर्षात भारतीयांना अजून एक भेट; Bharat Biotech ची स्वदेशी लस 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी देण्याची समितीची शिफारस.
भारताच्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देखील काल दिल्लीत ड्राय रनचा आढावा घेताना पहिल्या टप्प्यातील 3 कोटी कोविड योद्धांची लस मोफत असेल अशी माहिती दिली होती. जुलै महिन्यापर्यंत पहिल्या 27 कोटी उर्वरित प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांना लस देण्याबाबत विचार होऊ शकतो असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, कोविड योद्धे यांच्यासह 50 वर्षावरील आणि सहव्याधी असणार्यांना प्रामुख्याने लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत समाविष्ट करून घेण्याचा मानस आहे.
ANI Tweet
सीरम इन्सिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशिल्डचे डोस भारतामध्येच बनत आहे. ही लस लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनकाची आहे. भारतात त्याचे ट्रायल्स 'कोविशिल्ड' नावाने सीरम ने घेतल्या आहेत. तर कोवॅक्सिन ही भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांची लस असून ती स्वदेशी आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सार्या लसींच्या निर्मिती संस्थांना भेट देऊन त्याचा आढावा घेतला होता.