COVID-19 Vaccine Certification Row: भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी 10 दिवस विलगीकरण बंधनकारक; लसीकरण प्रमाणपत्रावरुन झालेल्या वादानंतर सरकारचा निर्णय
याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. यासाठी ब्रिटिश नागरिकांच्या लसीकरणाची स्थिती लक्षात घेतली जाणार नाही.
भारतात येणाऱ्या सर्व ब्रिटिश नागरिकांना (British Nationals) आता 10 दिवस विलगीकरणात (10-Day Quarantine) राहणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय आरटीपीसीआर चाचणीचा (RT-PCR Test) अहवाल सादर करावा लागणार आहे. यासाठी ब्रिटिश नागरिकांच्या लसीकरणाची स्थिती लक्षात घेतली जाणार नाही. सोमवार, 4 ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, भारत आणि ब्रिटनमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरूनही वाद उद्भवला होता. त्यावर प्रतिक्रियात्मक कृती म्हणून भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी कठोर नियम लागू केले आहेत.
यूकेने भारतीय लस प्रमाणपत्रांना मान्यता न देता भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर चाचणी आणि दहा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे केले होते. त्यावर उत्तर म्हणून भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. (UK Government कडून Travel Advisory मध्ये बदल करत Covishield चा Approved Vaccine मध्ये समावेश; भारतीयांना Quarantine चे नियम राहणार)
भारत सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, यूके मधून भारतात येणाऱ्या सर्व ब्रिटिश नागरिकांना प्रवासाच्या 72 तास आधी करोना चाचणी (आरटीपीसीआर) केल्याचा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल. तसेच विमानतळावर उतरल्यावर लगेच आणि आगमनानंतर आठ दिवसांनी पुन्हा करोना चाचणी करणे बंधनकारक असेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या लसीकरणाची स्थिती लक्षात घेतली जाणार नाही.
ब्रिटनमध्येच विकसित झालेल्या अॅस्ट्राझेनेको आणि ऑक्सफर्ड यांच्याच लसीची भारत निर्मित ‘कोविशिल्ड’ लशीला ब्रिटनने सुरवातीला मान्यता दिली नव्हती. नंतर ती मान्यता मिळाली. मात्र तरीही भारतातून ब्रिटनमध्ये जाणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली होती.