IPL Auction 2025 Live

Covid-19 Vaccination in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार कोविड-19 लस- Reports

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांना कोविड-19 ची लस लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे.

PM Narendra Modi | | (Photo Credits: File Photo)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री (Chief Ministers of All State) यांना कोविड-19 ची लस (Covid-19 Vaccine) लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती रिपोर्ट्समधून समोर येत आहे. त्याचबरोबर 50 वर्षांवरील इतर राजकीय नेत्यांना दुसऱ्या टप्प्यात लस मिळणार आहे. दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. (Covid 19 Vaccination:  केंद्राने राज्य निहाय दिलेल्या कोविड-19 लसीकरणाची वेळापत्रकाची माहिती)

लसीकरण  सुरु झाल्यापासून मंगळवार पर्यंत एकूण 4,54,049 इतक्या लोकांना लस देण्यात आली असून त्यापैकी 0.18 टक्के लोकांवर किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. तर 0.002 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. लस घेतल्यानंतर ज्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला त्यासाठी लस कोणत्याही प्रकारे जबाबदार ठरली नाही. (BMC ने आरोग्यसेवकांना दिली Walk-in Vaccination ची मुभा; जाणून घ्या, काय आहे हा पर्याय?)

आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, आज देशात 15,223 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 151 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 19,965 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,06,10,883 इतका झाला असून त्यापैकी 1,92,308 सक्रीय रुग्ण आहेत. तर 1,02,65,706 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत 8,06,484 जणांना लस देण्यात आली आहे. दरम्यान, 16 जानेवारीपासून सुरु झालेले लसीकरण दोन दिवसांसाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे.