COVID 19 Precautionary Dose Online Appointments: आजपासून सुरू होणार 'बुस्टर डोस' साठी ऑनलाईन अपॉईंटमेंट; पहा कसा, कधी, कोणाला मिळणार डोस

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोविड 19 लसीचे यापूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या हेल्थकेअर वर्कर्स अर्थात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कस आणि 60 वर्ष आणि त्यापेक्षा वरील सहव्याधी असणारे नागरिक 10 जानेवारीपासून तिसरा डोस घेऊ शकतात.

COVID-19 Vaccine (Photo Credits: IANS)

भारतामध्ये वाढती ओमिक्रॉनची (Omicron) दहशत आणि कोरोनाबाधितांची संख्या पाहता 3 जानेवारीपासून वयवर्ष 15-18 साठी कोविड 19 लसीकरण सुरू झाल्यानंतर आता देशात बुस्टर डोस (Booster Dose) अर्थात Precautionary Dose देण्यासाठी 10 जानेवारी सोमवार पासून सुरूवात होत आहे. आज (8 जानेवारी) पासून त्याच्या रजिस्ट्रेशनला सुरूवात होत आहे. दरम्यान काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिसर्‍या डोस साठी कोविन अ‍ॅप वर पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही तसेच लाभार्थ्यांना वॉक इन (Walk In) देखील लस मिळणार आहे. त्यामुळे आता तिसरा डोस नेमका कुणाला, कधी, कसा मिळणार आहे याचा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर जाणून घ्या त्यासंबंधी सारे अपडेट्स!

COVID 19 Precautionary Dose कसा, कधी, कुणाला मिळणार?

भारतामध्ये काल 150 कोटी लसींच्या डोसचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. कोरोनापासून सुराक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आता कोविड 19 नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचे आहे असे आवाहनदेखील केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif