Travel Advisory on COVID-19: भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी नवी नियमावली जारी

दरम्यान आज भारताकडून नवी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.

Travel advisory on COVID-19 | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Outbreak: डिसेंबर 2019 पासून जगभरात दहशत पसरवणारा कोरोना व्हायरस आता भारतामध्ये दाखल झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान दिल्ली, हैदराबाद, तेलंगणा मध्ये COVID-19 चे रूग्ण आढळल्याने आता त्याची दहशत हळूहळू वाढायला लागली आहे. यामध्ये आता जीवघेणा कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतामध्ये भीषण स्वरूप घेऊ नये म्हणून सरकारकडून उपाययोजना राबवायला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज भारताकडून नवी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. त्यानुसार परदेशातून भारतामध्ये येणार्‍या पर्यटकांसोबतच, परदेशामध्ये राहणार्‍या भारतीयांवरही बंधनं घालण्यात आली आहेत. Corona चा हाहाकार! चीन पाठोपाठ आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे बळी, वाचा सविस्तर.  

COVID-19 च्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेली नवी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी काय?

पुढील काही दिवसांतच परीक्षांचा हंगाम संंपल्यानंतर आता सुट्ट्यांचे वेध लागायला सुरूवात होईल. समर हॉलिडेजमध्ये अनेकजण परदेशवारी करण्याचे प्लॅन करतात. परंतू चीनसह आता जगभरात वाढत असलेली कोरोना व्हायरसची दहशत पाहता तुम्ही कोणत्या देशामध्ये सुट्ट्यांचे प्लॅन बनवत आहात तेथील सध्याच्या स्थिती आहे आहे? हे एकदा पडताळून पहा. दरम्यान आज भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाारतीयांंना दिला आहे.