COVID-19 रुग्णावाढ नियंत्रणासाठी Omicron Vaccine मार्च महिन्यात दाखल होईल, फायजर प्रमुखांचा अंदाज
या पार्श्वभूमीवर वाढणारा धोका विचारात घेऊन अनेक देशांनी कोरोनाचा बुस्टरडोस देण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रोन संक्रमन नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने लस (Omicron Vaccine) निर्मितीचे कामही वेगाने सुरु आहे.
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus ) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोन (Omicron) मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या पार्श्वभूमीवर वाढणारा धोका विचारात घेऊन अनेक देशांनी कोरोनाचा बुस्टरडोस देण्यास सुरुवात केली आहे. ओमायक्रोन संक्रमन नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने लस (Omicron Vaccine) निर्मितीचे कामही वेगाने सुरु आहे. दिग्गज फार्मा कंपनी फायजर (Pfizer) विश्वास व्यक्त केला आहे की, ओमायक्रोन व्हेरीएंटला लक्ष्य करणारी कोविड-19 (COVID-19) लस येत्या मार्च (2022) पर्यंत बाजारात आणली जाईल. फायजरच्या प्रमुखांनी ही माहिती नुकतीच दिली.
फायजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बौर्ला यांनी सीएनबीसीला सांगितले की, सरकारच्या वतीने वाढत्या मागणीला अनुसरुन फायजरने आगोदरच एक लस निर्माण केली आहे. कारण कोविड-19 संक्रमणाची संख्या वाढतेच आहे. यात अशा लोकांची संख्या अधिक आहे ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तरीही त्यांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे. बौर्ला यांनी म्हटले की, हे वॅक्सीन मार्च महिन्यात तयार होईल. मला माहीत नाही की याची आवश्यकता असेल किंवा नाही. तसेच, याचा वापर कसा केला जाईल याबाबत ही मला फारसे सांगता येणार नाही. (हेही वाचा, COVID-19 Booster Dose In India: भारतात आजपासुन बूस्टर डोस देण्यास सुरूवात, जाणून घ्या मार्गदर्शक तत्वे)
फायजरचे सीईओ म्हणतात की, दोन वॅक्सीन डोसवाली विद्यमान व्यवस्था आणि एक बुस्टर डोस यांनी ओमायक्रोन संक्रमितांना आवश्यक ती सुरक्षा दिली आहे. दरम्यान थेट ओमायक्रोन व्हेरीएंटला लक्ष्य करणाऱ्या वॅक्सीन स्ट्रेनच्या बेलगाम होण्याविरोधात ही लस प्रभावी ठरेल. आणखी एका वेगळ्या मुलाखतीत मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बन्सेल यांनी म्हटले की, कंपनी एक बूस्ट विकसीत करत आहे. जी ओमायक्रोन आणि इतर स्ट्रेनचा सामा करु शकते. त्यांनी म्हटले की, संभावित बूस्ट डोससाठी जगभरातील आरोग्य क्षेत्रातील दिग्गज चर्चा करु शकतात.