COVID-19 Lockdown: दिल्ली आणि उत्तर प्रदेशात लॉकडाउन वाढवला, येत्या 17 मे पर्यंत लागू असणार निर्बंध

कोरोनाचे निर्बंध येत्या 17 मे पर्यंत लागू असणार आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo: PTI)

COVID-19 Lockdown: कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने लॉकडाउन पुन्हा वाढवला आहे. कोरोनाचे निर्बंध येत्या 17 मे पर्यंत लागू असणार आहेत. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुन्हा विकेंड कर्फ्यू लावण्यात आला आहे. या दरम्यान आधीसारखेच नियम लागू असणार आहेत. अत्यावश्यक सेवांनाच फक्त परवानगी दिली जाणार आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.(देशाला PM आवास नाही, श्वास पाहिजे, राहुल गांधींनी फोटो ट्विट करुन केंद्र सरकारवर साधला निशाणा)

अप्पर मुख्य सचिव सूचना नवनीत सहगल यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी असे म्हटले की, हे निर्बंध कोरोना कर्फ्यू प्रमाणेच असतील. या दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. प्रदेशात सुरुवातीला 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र नंतर 6 मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर आता 10 मे पर्यंत केला होता आणि आता 17 मे केला आहे.

Tweet:

उत्तर प्रदेशात कोरोनाचे गेल्या 24 तासात आणखी 26,847 रुग्ण आढळले आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2,45,736 आहे. गेल्या 24 तासात 2,23,155 चाचण्या पार पडल्या आहेत. चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या एका वर्षात सक्रिय रुग्णांमध्ये 60 हजारांची घट झाली आहे.(गुजरात मध्ये गोशाळेत कोरोना सेंटर सुरु, रुग्णांना दिली जातायत दूध आणि गोमुत्रापासून तयार केलेली औषधे)

तर दिल्लीत सुद्धा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या खाली येत आहे. पण परिस्थितीत नियंत्रणात आणण्यास वेळ लागणार आहे. देशाची राजधानी दिल्लीत सुद्धा परिस्थिती बिघडली आहे. यंदा लॉकडाउन दरम्यान दिल्लीतील मेट्रो सुद्धा बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असे म्हटले की, दिल्लीत लॉकडाउन एका आठवड्यांनी वाढवला आहे. जो पुढील सोमवार पर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत लागू असणार आहे. दिल्लीत उद्यापासून मेट्रो सेवा पूर्णपणे बंद असणार आहे.

Tweet:

Tweet:

कोरोनाच्या लसीकरणचा वेग वाढत आहे. पहिल्या डोससह दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात 17,364 नवे रुग्ण आढळलेआहेत. त्याचसोबत 332 जणांचा बळी गेला आहे. यावेळी लॉकडाउन आधीपेक्षा अधिक कठोर असणार आहेत.