COVID-19 In India: भारतात मागील 24 तासांत 3,62,727 जणांना कोरोनाचे निदान; 4,120 जणांनी गमावले जीव

सध्या या संक्रमणाला आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोना वायरसचं घोंघावणारं संकट पाहता आता दिवसागणिक स्थिती चिंताजनक बनली चालली आहे. भारतात आज केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 3,62,727 जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा 4,120 आहे. यामुळे आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 2,37,03,665 पर्यंत पोहचला आहे. सध्या देशात विविध भागांमध्ये उपचार घेणार्‍या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 37,10,525 पर्यंत पोहचली आहे.

दरम्यान काल 3,62,727 लोकांना नव्याने कोरोनाची लागण झालेली असली तरीही डिस्चार्जचा आकडा देखील त्याच्या जवळ जाणारा आहे. काल 3,52,181 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. त्यामुळे या आजाराला घाबरण्यापेक्षा वेळीच लक्षणं ओळखून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्यासाठी समोर या असं आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे. Coronavirus उपचारादरम्यान Ivermectin औषधाच्या वापरावरुन WHO कडून पुन्हा एकदा गंभीर इशारा.

भारतातील मागील 24 तासांतील कोरोनाची आकडेवारी

भारतातील 24 तासात नवे रुग्ण – 3,62,727

भारतातील 24 तासात डिस्चार्ज – 3,52,181

भारतातील 24 तासात मृत्यू – 4,120

एकूण रूग्ण – 2,37,03,665

एकूण डिस्चार्ज – 1,97,34,823

एकूण मृत्यू – 2,58,317

अॅक्टिव्ह रुग्ण – 37,10,525

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 17,72,14,256

देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आता मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन यांच्यासोबतच आता लसीकरण देखील आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी लस टोचून घेण्याचं देखील आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 17,72,14,256 कोविडचे डोस देण्यात आले आहेत.