COVID 19 In India: भारतामध्ये पुन्हा उच्चांकी कोरोनारूग्णांची नोंद; मागील 24 तासांत 4,12,262 जणांना कोरोनाचे निदान
ही चिंताजनक बाब आहे.
भारतामध्ये कोरोना वायरसच्या (Coronavirus) दुसर्या लाटेचा कहर अजूनही सुरू आहेच. मागील काही दिवसांत महाराष्ट्रात रूग्णवाढीचा दर मंदावल्याचं चित्र असलं तरीही देशात आज पुन्हा मागील 24 तासांमध्ये कोरोना रूग्ण वाढीमध्ये नवा उच्चांक समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात काल 4,12,262 जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर 3,980 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे आता भारतामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2,10,77,410 वर पोहचला आहे तर 1,72,80,844 जणांनी त्यावर मात केली आहे. देशात आतापर्यंत 2,30,168 जणांचे कोविड 19 मुळे निधन झाले आहे. तर 35,66,398 जणांवर उपचार सुरू आहेत. Double Masking करताना नेमके कोणते दोन मास्क एकत्र घालावेत? पहा केंद्र सरकारने दिलेला सल्ला.
उत्तर भारतामध्ये कोरोनाचा कहर वाढत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब मध्ये या काळात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलं आहे. उत्तर प्रदेशात 357 जणांचा मृत्यू झाला आहे तर 31,165 नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. लखनऊ, कानपूर मध्ये ही मृत्यू दर वाढल्याचं चित्र आहे. देशात सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या राज्यांत महाराष्ट्रात 57,640 रूग्ण, कर्नाटकात 50,112 रूग्ण, केरळ मध्ये 41,953 रूग्ण तर उत्तर प्रदेशात 31,111 आणि तामिळ नाडू मध्ये 23,310 रूग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकूण रूग्णसंख्येच्य तुलनेत 49.52% रूग्ण हे याच 5 राज्यांमधील आहे. मृत्यू मध्ये महाराष्ट्रात 920 सर्वाधिक तर त्या खालोखाल उत्तरप्रदेशात 353 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. Hospital Bed Availability Online: मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये रूग्णालयांत COVID-19 Emergency वेळी उपलब्ध Vacant ICU, Oxygen Beds ची इथे पहा माहिती.
दरम्यान महाराष्ट्रासह देशपातळीवर देखील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी आता लसीकरणाचा वेग वाढवण्याला प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांनी दुहेरी मास्क घालण्याचं तसेच आता घरातही मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 18 वर्षांवरील सार्यांनाच कोविड ची लस देण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.