Covid-19 And JN-1 Updates: नवीन 300 संक्रमितांसह देशभरात कोरोनाचे 2,669 रुग्ण, जेएन-वन विषाणूचाही वाढता धोका; केरळमध्ये तिघांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालाने आज (20 डिसेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार, नव्याने संक्रमित झालेल्या 300 जणांसह देशभरात कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 2,669 वर पोहोचली आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोविड-19 (Covid-19 Updates) संक्रमितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालाने आज (20 डिसेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार, नव्याने संक्रमित झालेल्या 300 जणांसह देशभरात कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 2,669 वर पोहोचली आहे. केरळमध्ये तीन कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याशिवाय कोरोनाचा नवा व्हेरीएंट NJ-1 (JN-1 Updates) संक्रमितांची संख्याही वाढत असल्याने चिंतेचे कारण ठरत आहेत. नवीन कोविड व्हेरीएंटचा संसर्ग मुख्यत्वे केरळ, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात आढळून आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 4,44,70,576 झाली आहे आणि राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के इतका आहे.

कोविड संसर्गजन्य- डॉ श्रीजीथ एन कुमार

विद्यमान केविड-19 स्थितीबाबत बोलताना केरळमधील आरोग्य तज्ज्ञ श्रीजीथ एन कुमार यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, कोवीड आजाराची इतर आजारांसोबत तुलना केली जाऊ शकते. तो पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकत नाही. मात्र, त्याला नियंत्रणात ठेवता येऊ शकते. त्यांनी नमूद केले की रोगाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी तो कमी झाला आहे. मृत्यू दर पूर्वीइतका उच्च नाही. त्याची तुलना सामान्य इन्फ्लूएंझा किंवा नियमित सर्दीशी केली जाऊ शकते. कोविड हा इतर संसर्गजन्य आजारांसारखाच आहे. ज्याचा पूर्णपणे नाश होऊ शकत नाही. तथापि, या रोगाचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे आणि मृत्यूदर, म्हणजे या आजाराला बळी पडलेल्या लोकांचे प्रमाण पूर्वीइतके नाही. हा आता इतर इन्फ्लूएन्झा किंवा इतर कोणत्याही सामान्य सर्दीसारखा झाला आहे, असे डॉ श्रीजीथ एन कुमार यांनी एएनआयला सांगितले. (हेही वाचा, COVID-19 Update: JN.1 सबव्हेरियंटबद्दल चिंता नको; INSACOG प्रमुखांकडून दिलासा)

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून संभाव्य स्थितीचा आढावा

दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी भारतातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा बुधवारी घेतला. या वेळी त्यांनी कोविडच्या संभाव्य आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्याच्या संक्रमणावर बारिक नजर ठेवणे, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडून केली जाणारी तयारी याबाबत माहिती घेतली. डॉ. मांडविया यांनी कोविड-19 विषाणूच्या नवीन आणि नवीन स्ट्रेन विरूद्ध सतर्क राहण्यावर भर दिला. त्यांनी सर्व राज्यांना पाळत ठेवणे (ट्रेसिंग), औषधे, ऑक्सिजन सिलिंडर, कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि लसींचा पुरेसा साठा ठेवण्याचे आवाहन केले. कोविड-19 च्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी केंद्रीय आणि राज्य या दोन्ही स्तरांवर दर तीन महिन्यांनी संयुक्त मॉक ड्रिल आयोजित करण्याबातही त्यांनी विचार व्यक्त केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif