COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Bharat Biotech च्या Covaxin ला Phase 3 मानवी चाचण्यांसाठी परवानगी; देशात 10 राज्यांत होणार ट्रायल्स
ही
भारतामध्ये विकसित होत असलेली कोविड 19वरील संभाव्य लस 'कोवाक्सिन' (Covaxin)ला तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि आयसीएमआर यांच्याकडून विकसित केली जात आहे. दरम्यान डीसीजीआई ने आता या लसीच्या पहिल्या दोन टप्प्यातील अहवाल पाहून तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणीला परवानगी दिली आहे. 'कोवाक्सिन' (Covaxin)ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे. Bharat Biotech, Serum Institute of India कडून COVID-19 ला रोखण्यासाठी Intranasal Vaccines ची निर्मिती; जाणून लसीच्या या प्रकाराबद्दल आणि त्याच्या अपडेट्स विषयी!
Drugs Controller General of India (DCGI) कडे तिसर्या टप्प्यातील लसीच्या मानवी चाचणीकडे 2 ऑक्टोबर दिवशी अर्ज करण्यात आला होता. मागील अहवाल पाहता आता ही मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्स नुसार, कोवाक्सिनच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी सुमारे 28,400 स्वयंसेवकांचा समावेश करून घेतला जाणार आहे. हे स्वयंसेवक 18 आणि त्यावरील वयोगटातील असतील.
Covaxin ही लस तिसर्या टप्प्यात भारतामध्ये मुंबई, दिल्ली, लखनौ सह 10 राज्यांतील 19 शहरांमध्ये दिली जाईल.निष्क्रिय व्हायरस इंजेक्शनच्या माध्यमातून 0 आणि 28 व्या दिवशी शरीरात सोडला जाईल. जर या लसीचे दुष्परिणाम होऊन एखादी व्यक्ती दगावल्यास भरपाई म्हणून 75 लाखांचा स्वयंसेवकाचा विमा असेल.
भारतामध्ये इंजेक्शनच्या स्वरूपात कोवॅक्सिन विकसित केल्यानंतर आता नाकाद्वारे देण्यात येणारी लस देखील विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे. प्रि-क्लिनिकल रिझल्ट सकारात्मक आल्यानंतर आता क्लिनिकल ट्रायल्स सुरू होणार आहे.