Counterfeit Currency in UP: अमेठी मध्ये ATM मधून निघाल्या 200 रूपयांच्या नकली नोटा; शहरात उडाला गोंधळ
त्याच्यानंतर एका तरूणाने पैसे काढल्यानंतर त्यालाही नकली नोट मिळाली.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मध्ये अमेठी (Amethi) मध्ये एटीएम मध्ये नकली नोटा आल्याची घटना समोर आली आहे. अमेठीच्या मुंशीगंज रोड वरील भाजी मंडई जवळ असलेल्या एका बॅंकेच्या एटीएम मध्ये 200 रूपयांच्या नोटा नकली निघाल्या. या घटनेनंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला. यामध्ये अमेठी कोतवाली कडे तक्रार नोंदवली आहे. तक्रार मिळताच त्यांनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंशीगंज रोड सब्जी मंडी जवळ इंडिया वन बॅंकेच्या एटीएम मधील आहे. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लोकं पैसे काढायला गेले तेव्हा नकली नोटा आल्या. एकापाठोपाठ अनेक ग्राहकांना नकली नोटा मिळाल्या आणि गोंधळ वाढत गेला. या प्रकारानंतर तेथे गर्दी देखील वाढली. काहींनी या नकली नोटांचे फोटो सोशल मीडीया मध्येही शेअर केले. ग्राहकांनी बॅंकेच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. हे देखील नक्की वाचा: Fake Currency Alert: 50 आणि 200 च्या बनावट नोटांविरोधात RBI चा सतर्कतेचा इशारा; जाणून घ्या कशा ओळखाल खोट्या नोटा .
ग्राहकांनी नकली नोटा येत असल्याचं पाहून तात्काळ पोलिसांना हा प्रकार कळवला. तेव्हा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. एटीएम मधून जेव्हा नकली नोटा येत होत्या तेव्हा कुणीही गार्ड तेथे उपस्थित नव्हता. ग्राहकांनीही काढलेल्या नोटांवर full off fun असं लिहलं होतं.
एटीएम द्वारा 5 हजार रूपये काढल्यानंतर त्याला इंडिया वनच्या एटीएममध्ये 200 ची एक नोट नकली मिळाली. त्याच्यानंतर एका तरूणाने पैसे काढल्यानंतर त्यालाही नकली नोट मिळाली.