Baba Ramdev यांनी पुन्हा लॉन्च केली COVID 19 वरील औषधं आता WHO कडून सर्टिफाईड आहे Coronil

तर 16 अन्य रिसर्च पेपर्स पाईपलाईन मध्ये आहेत

Coronil Tablets For COVID 19| Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी पुन्हा कोविड19 वर आयुर्वेदिक उपाय म्हणून कोरोनिल औषध ( Coronil Tablets) बाजारात लॉन्च केले आहे. आज दिल्लीमध्ये त्याचा एक कार्यक्रम पार पडला. या वेळेस मोदी सरकार मधील मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan)  देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पतंजलीने नव्याने औषधं सादर करताना त्यांच्या कोविड 19 वरील या औषधांना जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) सर्टिफिकेट असल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच या कोरोनिल औषधांचा वैज्ञानिक पुरावा देखील पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आला आहे.

बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्येही आयुष मंत्रालयाकडून कोरोनिल टॅबलेटला मान्यता देण्यात आली आहे. आता ही औषधं कोविड 19 चा सामना करण्यासाठी सामन्यांना उपलब्ध असतील. रामदेव बाब यांच्या Patanjali समूहाने Coronil च्या विक्रीतून केवळ 4 महिन्यांत कमावले तब्बल 241 कोटी.

ANI Tweet

पतंजली कडून यापूर्वी कोरोनिल 23 जून 2020 दिवशी लॉन्च करण्यात आली होती. त्यावेळेसही या औषधाने कोरोना वर 7 दिवसांत मात करता येऊ शकते असं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर काही दिवसांतच आयुष मंत्रालयाने त्यांना अशाप्रकारे दावा करण्यापासून रोखलं होतं. मात्र आता कोरोनिल ही सरकारच्यया कोविड 19 मधील औषधोपचारांमध्ये नियमित औषधांसोबत वापरली जाऊ शकते असे सांगण्यात आले आहे.

बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनिल बाबत 9 रिसर्च पेपर जगातील सर्वात प्रभावी अशा रिसर्च जर्नल्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. तर 16 अन्य रिसर्च पेपर्स पाईपलाईन मध्ये आहेत. त्यामुळे आता चिकित्सा क्षेत्रामध्ये भारत जगाला वाट दाखवू शकतो असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.