Coronavirus: Lockdown संपणार की वाढणार? 14 एप्रिल नंतर सरकारचा विचार काय?
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि देशाच्या एकूण सुरक्षीततेचा विचार करता अद्याप तरी हा लॉकडाऊन कमी करण्याची कोणतिही चिन्हं दिसत नाहीत.
घरात बसायचं तर हाताला काम नाही. बाहेर पडायचं तर लॉकडाउन (Lockdown). कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या जनतेला उत्सुकता आहे ती 14 एप्रिल रोजी नेमकं काय घडणार? सध्या सुरु असलेला Lockdown वाढणार की संपणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च या दिवशी कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हापासून अत्यावश्यक सेवा वगळता अवघा देश ठप्प आहे. त्यामुळे जगभरात असलेले कोरोना व्हायरस संकट आणि भारतात त्याबाबत केली जाणारी उपाययोजना पाहता सरकार नेमका कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, लॉकडाऊन असतानाही विविध राज्यांमध्ये वाढत असलेली कोरना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या पाहता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकारं आणि अनेक अभ्यासक, विचारवंत, वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आदी मंडळींनी केंद्राकडे लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, केंद्र सरकार राज्यांच्या मागणीवर जरुर सकारात्मक विचार करु शकते.
महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये वाढत असलेल्या कोरोना व्हायरस बाधितांची संख्या विचारात घेता हे संकट अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि देशाच्या एकूण सुरक्षीततेचा विचार करता अद्याप तरी हा लॉकडाऊन कमी करण्याची कोणतिही चिन्हं दिसत नाहीत. (हेही वाचा, Coronavirus Impact: कोरोना व्हायरस, लॉकडाउन पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लवकरच जाहीर करु शकतं दुसरं आर्थिक पॅकेज)
एएनआय ट्विट
देशभरात सध्या लॉकडाऊन स्थिती आहे. मात्र, 14 एप्रिल हा सध्यास्थिती तरी सुरु असलेल्या लॉकडाऊनचा अखेरचा दिवस आहे. तो दिवस गृहीत धरुन ऑनलाइन माध्यमांतून अनेक नागरिकांनी बुकींग सुरु केले आहे. सुरु असलेले बुकींग विचारात घेऊन देशातील लॉकडाऊन संपुष्टात येईल या चर्चेला बळ मिळत आहे. मात्र, सरकारी पातळीवरुन अद्याप तरी त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.