दिलासादायक! सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून नष्ट होईल Coronavirus; नवीन रिपोर्टमध्ये दावा, जाणून घ्या सविस्तर
त्याचवेळी पुढचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्राने लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली व सध्या याचा 5 वा टप्पा चालू आहे
भारतामध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) शिरकाव झाल्यानंतर मार्चमध्ये या महामारीने जोर धरायला सुरुवात केली. त्याचवेळी पुढचा संभाव्य धोका लक्षात घेता केंद्राने लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली व सध्या याचा 5 वा टप्पा चालू आहे. मात्र अजूनही दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच आहे. या महामारीच्या संपुष्टाबाबत एक दिलासादायक बाब समोर येत आहे. असा दावा केला जात आहे की, देशातील कोरोना विषाणूचा अंत आता जवळ आला आहे. संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत (Mid-September) भारतात कोरोना विषाणूचा पूर्णपणे नाश होईल.
एका संशोधनाच्या आधारे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून कोरोना विषाणूचे पूर्णपणे निर्मूलन केला जाईल असा दावा केला आहे. एपिडेमिओलॉजी इंटरनॅशनल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेले हे विश्लेषण आरोग्य मंत्रालयांतर्गत (Health Ministry), आरोग्य सेवा महासंचालनालयात उप-महासंचालक (सार्वजनिक आरोग्य) डॉ. अनिल कुमार (Dr Anil Kumar) आणि उप सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रुपाली रॉय यांनी केले आहे. वास्तविक या दोघांनीही बेली मॉडेलच्या (Bailey’s Model) आधारे हा दावा केला आहे. HT ग्रुपच्या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, या मॉडेलनुसार संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आणि बरे किंवा मरणा पावलेल्या लोकांची संख्या समान झाल्यास, त्या विषाणूचा नाश व्हायला सुरुवात होते. भारतामध्ये हे होण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागेल.
अहवालानुसार, 2 मार्चपासून भारतात वास्तविक कोरोना विषाणू साथीच्या रोगाचा प्रारंभ झाला आणि तेव्हापासून कोविड-19 च्या सकारात्मक घटनांमध्ये वाढ झाली. विश्लेषणासाठी, तज्ञांनी 1मार्च ते 19 मार्च या कालावधीत वर्ल्डमास्टर डॉट कॉम माहितीवरून कोविड-19 चा डेटा गोळा केला. यामध्ये संसर्गमुक्त प्रकरणे आणि मृत्यूशी संबंधित प्रकरणे आणि सक्रीय प्रकरणांची संख्या समाविष्ट होती.
(हेही वाचा: भारतात लॉकडाउन पूर्णपणे अपयशी; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका)
दरम्यान, जून-जुलैमध्ये भारतामध्ये कोरोनाचे आणखी संक्रमित रुग्ण आढळतील, असा संशोधनात दावा केला आहे. त्याचा परिणामही दिसून यायला सुरुवात झाली आहे. 7 दिवसांत 24 तासांत संक्रमित लोकांची संख्या 9 हजाराहून अधिक होत चालली आहे. मात्र, अभ्यासात असेही सांगितले गेले की कोरोनाविरूद्धच्या युद्धात लॉकडाऊनचा फार मोठा फायदा झाला.