Coronavirus Updates: कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण घटले, सरासरी प्रमाण 7.25 टकक्यांवर; देशभरातून दिलासादायक वृत्त

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेतून देशाला काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण ( Coronavirus Updates) झपाट्याने घसरत आहे. दैनंदिन संक्रमितांच्या संख्येतही मोठी घट होत आहे. पाठिमागील 24 तासात देशभरात एकूण 83,876 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आला आहे.

Coronavirus Updates: कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण घटले, सरासरी प्रमाण 7.25 टकक्यांवर; देशभरातून दिलासादायक वृत्त
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेतून देशाला काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण ( Coronavirus Updates) झपाट्याने घसरत आहे. दैनंदिन संक्रमितांच्या संख्येतही मोठी घट होत आहे. पाठिमागील 24 तासात देशभरात एकूण 83,876 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे आढळून आला आहे. ही संख्या आजवरच्या दैनंदिन आकडेवारीत 22 % घट दाखवत आहे. या आधी शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा दैनंदिन संक्रमितांची संख्या 1.07 लाख इतकी नोंदली गेली होती. दरम्यान, पाठिमागील 24 तासात 895 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या 5,02,874 इतकी झाली आहे.

पाठिमागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. रुग्णालयात उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती संख्या 11,08,938 इतकी झाली आहे. दरम्यान, टक्केवारीमध्ये देशातील सक्रीय रुग्णांचे प्रमाण विचारात घेता ते 2.62% इतके आहे. देशात पाठीमागील 24 तासात 1,99,054 कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. त्यामुळे उपचार घेऊन बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,06,60,202 इतकी झाली आहे.

देशातील कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, ती वढ 96.19% इतकी टप्प्यावर पोहोचली आहे. दैनंदिन कोरोना संक्रमणाचा वेग 7.25 % आणि साप्ताहिक संक्रमिणाचा वेग 9.18% इतका झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

ट्विट

देशभरतात लसीकरण मोहिमेंतर्गत 169.63 कोटी नागरिकांना करोना लस देण्यात आली आहे. तर पाठिमागील 24 तासात कोरोना संसर्गाचे रुग्ण शोधण्यासाठी 11,56,363 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 74.15 नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2022 10:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).