Coronavirus Updates in India: कोरोना बाधितांमध्ये 54% रुग्ण 18-44 वयोगटातील; कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 51% रुग्ण 60 वर्षांवरील- आरोग्य मंत्रालय

कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांमध्ये कोरोना बाधितांमध्ये 54% रुग्ण 18-44 वयोगटातील आहेत.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांमध्ये 54% रुग्ण 18-44 वयोगटातील आहेत. तर कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्यांपैकी 51% रुग्ण हे 60 वर्षांवरील आहेत. (देशात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अग्रस्थानी)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधितांमध्ये 8% रुग्ण हे वयवर्ष 17 पर्यंत आहेत. तर 14% रुग्ण हे 18-25 वयोगटातील आहेत. 26-44 वयोगटातील 40% लोक कोरोना बाधित आहेत. 45-60 वयोगटातील 26% रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांची आकडेवारी लक्षात घेता 60 पेक्षा अधिक वयोगटातील 51% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45-60 वयोगटातील 36% रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

ANI HindiNews Tweet:

आरोग्य मंत्रालयाच्या काल सकाळच्या अपडेटनुसार, देशातील कोरोना बाधितांचा आकडा 37 लाखांच्या जवळपास पोहचला आहे. सध्या देशात 36 लाख 91 हजार 167 कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी 7 लाख 85 हजार 996 सक्रीय रुग्ण आहेत. तर 28 लाख 39 हजार 883 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दरम्यान 65 हजार 288 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.