Coronavirus: भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 3374 वर तर 79 जणांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची माहिती
त्यानुसार भारतात कोरोनाचे संक्रमण झाल्याचे 33474 रुग्ण तर 79 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने आता जगभरात आपले जाळे पसरवले आहे. त्यामुळे आता विविध देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येसोबत मृतांचा आकडा सुद्धा वाढत आहे. कोरोना व्हायरसने भारतात ही शिरकाव केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आतापर्यंतीची कोरोनाबाधितांसह मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतात कोरोनाचे संक्रमण झाल्याचे 33474 रुग्ण तर 79 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्रालयाचे जॉइंट सेक्रेटरी लव अगरवाल यांनी भारतातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आकडेवारी सांगितली आहे. देशात कोरोनाबाधित 3374 रुग्ण असून कालपासून ते आतापर्यंत 42 नव्या रुग्णांची यामध्ये भर पडल्याचे म्हटले आहे. एकूण 79 जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. तर 267 जणांनी उपचार घेऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तबलीगी जमीच्या नागरिकांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. मात्र या लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे कळले नसते तर कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता होती. (दिल्ली: मरकजच्या येथे गुन्हे शाखेकडून तपास सुरु; तबलीगी जमातीचे प्रमुख मौलानांसह अन्य जणांच्या विरोधात विरोधात FIR दाखल)
दरम्यान, देशातील सध्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पाहिला तर त्यामध्ये नव्या रुग्णांची अधिक भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून लॉकडाउनचे आदेश वाढवण्यासंबंधित कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.