Coronavirus महामारीची दुसरी लाट उताराला, भारतात 81 दिवसांमध्ये सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, पाठिमागील 24 तासात 58,419 जणांना संक्रमण
1576 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 87,619 रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची भारतात दुसरी लाट सुरु आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमीतांच्या संख्येचा वाढता आलेख काहीसा घटत असल्याचे संकेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (रविवार, 20 जुलै) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार (Coronavirus India Update) पाठिमागील 24 तासात देशात 58,419 (Corona India Cases) संक्रमित (Daily Positivity Rate)आढळले. पाठिमागील 81 दिवसांमधला हा सर्वात कमी आकडा आहे. पाठिमागील 81 दिवसांमध्ये प्रतिदिन रुग्णांची आकडेवारी सरासरी 60,000 इतकी राहिली आहे. आजच्या आकड्यावरुन कोरोना रुग्णांची देशातील संख्या घटत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवरीत पाठिमागील 24 तासात 58,419 (Corona India Cases) जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. 1576 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 87,619 रुग्ण उपचार घेऊन बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आले आहेत. कोरोना संक्रमित 1576 नागरिकांना पाठीमागील 24 तासात प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मोबादला नाही देऊ शकत, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती)
देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 2,98,81,965 इतकी झाली आहे. आतापर्यंत 2,87,66,009 नागरिक कोरोनावरील उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील कोरोना मृतांचा आकडा 3,86,713 वर पोहोचला आहे. तर देशात सध्यास्थितीत 7,29,243 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात 27,66,93,572 नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.
आकडेवारी सांगते की आजचा जवळपास 38 वा दिवस आहे. देशातील कोरोना रुग्णांची बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे आणि नव्या कोरोना संक्रमितांची संख्या घटते आहे. देशातील नियमीत कोरोना संक्रमितांचा सरासरी दर हा 3.22% वर आला आहे. रविवारचा दिवस पकडून पाठिमागचे 13 दिवस देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा सरासरी दर (Daily positivity rate) 5% किंवा त्यापेक्षा कमी राहिला आहे.
एनआय ट्विट
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरीएंट पहिल्यांदा उत्तर पूर्वेकडी दोन राज्यांमध्ये आढळला. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूर आणि मिझोराममध्ये हा व्हेरीएंट आढळला. हैदराबादच्या एका प्रयोगशाळेत मणिपूर येथील 20 नमूने तपासण्यात आले. ज्यात डेल्टा 18 व्हेरीएंट आढळले.मिझोराममध्ये कोरोना येथील अधिक संक्रमित व्हेरीएंट B.1.617.2. ची चार प्रकरणे आढळली, असे वृत्त आहे.