Coronavirus: कोरोना व्हायरस अफवांचा चिकन बाजाराला फटका, देशभरात मागणी 50 तर दर 70 टक्क्यांनी मंदावले

परंतू असे असले तरीही देशभरात केवळ अफवा पसरल्याने चिकन मार्केटला फटका बसला आहे. देशभरात चिकन मागणीत 50 टक्के तर, दरात 70 टक्के घट झाल्याची खंत गोदरेज एग्रोवेटने व्यक्त केली आहे.

Coronavirus & Chicken Market | Photo used for representation Purpose (Photo Credits: Pixabay)

भारतातील चिकन बाजार (Chicken Market) सध्या अडचणीत आहे. देशभरातील चिकन विक्रीमध्ये तब्बल 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली आहे. गोदरेज एग्रोवेट (Godrej Agrovet) अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विक्री मंदावल्यामुळे त्याचा परिणाम चिकन दरांवरही झाली आहे. चिकन दर तब्बल 70 टक्क्यांनी घसरले आहेत. हे केवळ कोरोना व्हायरस (COVID-19) बाबत पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे घडत असल्याचा गोदरेच एग्रोवेटचा दावा आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आटोक्यात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. जगभरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यावर अभ्यास सुरु आहे. मात्र, त्यासोबतच अफवांचे पीकही अमाप आले आहे. यात सोशल मीडिया आणि लोकचर्चा यांचा भर पडत आहे.

कोरोना व्हायरसबाबत देशभरातील अनेक नागरिक सोशल मीडियावर वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. अनेक लोक अंदाज व्यक्त करत आहेत कोणतीही ठोस माहिती नसताना दावा करत आहेत की, चिकन खाल्यामुळे कोरोना व्हायरस पसरतो आहे. गोदरेज एग्रोवेटचे निदेशक बीएस यादव यांनी म्हटले आहे की, पोल्ट्री शाखा गोदरेज टायसन फूड्स (Godrej Tyson Foods) सुद्धा अडचणीत आहे. गेल्या महिन्यात चिकनची विक्री 40 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. या आधीच्या आठवड्यातही सुमारे 6 लाख कोंबडा -कोंबडींच्या विक्रिमध्ये घट झाली आहे. (हेही वाचा, Coronavirus: जगभरातील 44 देशांतील 82,000 नागरिक कोरोना व्हायरस बाधित, सुमारे 2,800 जणांचा मृत्यू)

अफवांना आळा बसला आणि चिकन खाल्यामुळे कोरोना व्हायरस होतो हा गैरसमज दूर झाला तर देशभरात चिकन विक्रीचा टक्का येत्या 2-3 महिन्यांमध्ये वाढू शकतो. मागणी वाढली तर किमतीमध्येही वाढ होऊ शकतो. गोदरेज एग्रोवेटने पुढे म्हटले आहे की, सरकारने जाहीर केले आहे की, चिकन खाल्याने कोरोना व्हायरस होत नाही.

ब्रेडवर लावताय ते Butter अळ्यांपासून तर बनवलेलं नाही ना? Video पाहून बसेल धक्का : Watch Video 

राज्य सरकारनीही अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे. भारतात चिकन खाने हे निर्धोक आहे. परंतू असे असले तरीही देशभरात केवळ अफवा पसरल्याने चिकन मार्केटला फटका बसला आहे. देशभरात चिकन मागणीत 50 टक्के तर, दरात 70 टक्के घट झाल्याची खंत गोदरेज एग्रोवेटने व्यक्त केली आहे.