Coronavirus: कोरोना व्हायरस संक्रमित 'त्या' मृत रुग्णाचा राष्ट्रपती भवनाशी काहीही संबंध नाही - राष्ट्रपती भवन

तर, राष्ट्रपती भवनातील एका कर्मचाऱ्याचे कुटुंबीय 'त्या' मृत रुग्णाच्या संपर्कात आले होते. ज्या रुग्णाचा कोरोना व्हायरस संक्रमित अवस्थेत मृत्यू झाला.

Rashtrapati Bhavan (Photo Credits: PTI)

राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) कार्यालयातील कोणत्याही कार्मचाऱ्याला कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाले नाही. तसेच, 13 एप्रिल रोजी ज्या एका कोरोना व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तो व्यक्ती ना राष्ट्रपती भवन परिसरातील निवासी होता ना कार्यालयातील कर्मचारी, अशी माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी मृत्यू झालेला एक कोरोना बाधित रुग्ण हा राष्ट्रपती भवन परिसरातील रहिवासी तसेच कार्यालयातील कर्मचारी होता असा दावा प्रसारमाध्यमांकडून आपल्या वृत्तामधून केला जात होता. मात्र, राष्ट्रपती भवनाने अधिकृत प्रतिक्रिया देत तो व्यक्ती राष्ट्रपती भवनाशी संबंधित नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रपती भवनाने केलेल्या अधिकच्या तपासात पुढे आले आहे की, 'तो' रुग्ण हा राष्ट्रपती भवनाचा कर्मचारी नाही. तर, राष्ट्रपती भवनातील एका कर्मचाऱ्याचे कुटुंबीय 'त्या' मृत रुग्णाच्या संपर्कात आले होते. ज्या रुग्णाचा कोरोना व्हायरस संक्रमित अवस्थेत मृत्यू झाला. (हेही वाचा, Lockdown: कुटुंबासोबत मूळ गावी परतणाऱ्या 12 वर्षीय मुलीचा रस्त्यात मृत्यू; तेलंगना ते छत्तीसगढ पायी प्रवास बेतला जीवावर)

एएनआय ट्विट

दरम्यान, सूत्रांनी म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 125 कुटुंबीयांना सेल्फ क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. राष्ट्रपती भवनापर्यंत कोरोना व्हायरस संसर्ग पोहोचल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरस संक्रमीत 2000 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, या मृत रुग्णामुळे राष्ट्रपती भवनही हाय अलर्टवर असल्याची चर्चा सुरु झाली होती.