रमजानच्या महिन्याला आजपासून सुरुवात, संध्याकाळी 7 वाजता कर्फ्यू लागू होणार असल्याने मशिदीत न जाण्याचे आवाहन- असदुद्दीन औवेसी
कारण संध्याकाळी 7 वाजल्यापासून कर्फ्यू लागणार असून या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असल्याचे ही असदुद्दीन औवेसी यांनी स्पष्ट केले आहे.
रमजानच्या (Ramdana) महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून मुस्लिम बांधवांकडून या दिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच रमजानच्या काळात इफ्तार पार्टीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. मात्र सध्याची देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता धर्मगुरुंनी नागरिकांना यंदाचा रमजानचा सण घरीच साजरा करावा असे आवाहन केले आहे. याच पार्श्वभुमीवर एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी नागरिकांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करु नये असे आवाहन केले आहे. कारण संध्याकाळी 7 वाजल्यापासून कर्फ्यू लागणार असून या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई असल्याचे ही असदुद्दीन औवेसी यांनी स्पष्ट केले आहे.
मुस्लिम बांधवांच्या रमजान सणाचा चांद गुरुवारी दिसून आल्याने बहुतांश ठिकाणी आजपासून सुरुवात झाली आहे. मुस्लिम कॅलेंडरनुसार नवव्या महिन्याची सुरुवात झाली असून या पवित्र महिन्याच्या मंगलपर्वावर कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे नागरिकांना यंदाचा रमजानचा सण घरातच साजरा करवा लागणार आहे. तर असदुद्दीन औवेसी यांनी नागरिकांना रमजानच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. त्याचसोबत सर्वांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याचे अपील केले आहे.( दिल्ली जामा मशिदीच्या शाही इमामांचं मुस्लिम बांधवांना रमजान दरम्यान घरीच नमाज अदा करण्याचं आवाहन, 'सरकारी नियमावलीचं पालन केल्यास लवकरच COVID 19 वर मात करू')
दरम्यान, रमजानच्या काळात अल्लाह त्यांच्या लोकांसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले करतो असे मानले जाते. मुस्लिम बांधवांवासाठी रमजानचा महिना फार महत्वाचा मानला जात असून या वेळी पाच वेळा नमाज अदा केला जातो. तसेच कडक उपवासाचे पालन करत फक्त फळं आणि पाण्याचे सेवन केले जाते. मात्र सध्या देशात कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना मशिदीत जाऊन नमाज अदा करता येणार नाही आहे.