Coronavirus Pandemic Update: जगासमोर Omicron नंतर Delmicron स्ट्रेनचा धोका, कोविड-19 महामारीने वाढवली नवी चिंता
या चिंतेतून जग काहीसे सावरत असतानाच सुरुवातील 'डेल्टा' आणि त्यानंतर ओमायक्रोन (Omicron) हा कोविडचा नवाच स्ट्रेन पुढे आला. ओमायक्रोन स्ट्रेनच्या धोक्यातून सावरण्याठी जग वाट काढत असतानाच आता ‘डेल्मिक्रॉन’ (Delmicron) नावाचं सावट आले आहे.
जगभरात कोरोना व्हायरस महामारीत (Coronavirus Pandemic) चिंतेचा विषय ठरली आहे. या चिंतेतून जग काहीसे सावरत असतानाच सुरुवातील 'डेल्टा' आणि त्यानंतर ओमायक्रोन (Omicron) हा कोविडचा नवाच स्ट्रेन पुढे आला. ओमायक्रोन स्ट्रेनच्या धोक्यातून सावरण्याठी जग वाट काढत असतानाच आता ‘डेल्मिक्रॉन’ (Delmicron) नावाचं सावट आले आहे. दरम्यान, ओमायक्रोन व्हायरस जगभरातील विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारने विविध राज्यांना खबरदारी घेण्यास बजावले आहे. त्यामुळे सन 2022 मध्येही जगाला कोरोनापासून मुक्ती मिळण्याची चिन्हे काहीशी कमीच आहेत.
जगभरात कोरोनाचा नवा स्ट्रेन ओमायक्रोन नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता 'डेल्मिक्रॉन' (Delmicron) नावाचा नवा व्हेरीएंट आल्याने चिंता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, यूरोप आणि अमेरिकेत कोरोना संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढण्यामागे 'डेल्मिक्रॉन' (Delmicron) हाच व्हेरीएंट कारणीभूत आहे. (हेही वाचा, सावधान! सरकारकडून व्हायरस अलर्ट जारी, तुमच्या ईमेलमध्ये 'Diavol' ransomware दिसू शकतो)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हटले आहेकी, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रोन व्हेरिएंटच्या म्यूटेशनमधून 'डेल्मिक्रॉन' (Delmicron) नावाचा एक नवाच व्हेरीएंट अमेरिका आणि यूरोपमध्ये भयावह रितीने पसरत आहे. या व्हेरीएंटबाबत अभ्यासक सांगतात की, आतापर्यंतच्या अभ्यासात तरी 'डेल्मिक्रॉन' (Delmicron) हा व्हेरीएंट कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रोन व्हेरिएंटच्या म्यूटेशनमधून निर्माण झाला आहे. मात्र, अभ्यासात हे मात्र जरुर आढळून आले आहे की, याचे संसर्गाचे प्रामाण इतर व्हेरीएंटच्या तुलनेत अधीक आहे. एक किंवा दोन व्हेरीएंट एकत्र येऊन नवा व्हेरीएंट बनण्याची चिन्हे अथवा शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत 30 पेक्षाही अधिक म्यूटेशन पुढे आले आहेत. दरम्यान, 'डेल्मिक्रॉन' (Delmicron) व्हेरीएंटच्या परिणाम आणि तीव्रतेबाबत अचूक माहिती पुढे यायला काही काळ वाट पाहावी लागेल.