Coronavirus: भारतातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 2069 वर पोहोचली, 53 रुग्णांचा मृत्यू, 155 जणांना डिस्चार्ज

त्यातील 155 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 53 इतकी झाली आहे

Coronavirus |

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या आता तब्बल 2069 इतकी झाली आहे. त्यातील 155 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत कोरोना व्हायरस बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या 53 इतकी झाली आहे. देशात सध्यास्थितीत कोरोना व्हायरस बाधित अॅक्टीव्ह रुग्ण 1860 इतके आहेत. केंद्रीय आरोग्य (Health Ministry) आणि कुटुंब कल्याण (Family Welfare) मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज दुपारीच पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी आरोग्य मंत्रालयाने आकडेवाली दिली होती की, गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची देशातील आकडेवारी 328 इतकी आहे. गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 151 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण आकडेवारी ही 1965 इतकी असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. (हेही वाचा, Coronavirus: देशभरात कोरोना व्हायरस बाधित 12 रुग्णांचा 24 तासात मृत्यू; धारावी येथील 300 घरं 19 दुकानं क्वारंटाईन - केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

एएनआय ट्विट

दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा आकडा गेल्या 24 तासांमध्ये 81 ने वाढून तो 416 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोना बाधित रुग्णांच आकडा 81 ने वाढला आहे. एकट्या मुंबई शहरातच 57 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, दिलासादायक वृत्त असे की रुग्णलयात उपचार घेत असलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 42 जणांना प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.