Coronavirus मुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दान करणार महिन्याभराचा पगार
कोरोना व्हायरस या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आपला एक महिन्याचा पगार प्रधानमंत्री रिलिफ फंडमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसचे (Coronavirus) वाढते संकट टाळण्यासाठी भारत देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) असणार आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय यावर नक्कीच परिणाम होणार आहे. गरीब, रोजंदारी कामगार यांचे देखील प्रचंड हाल होणार आहेत. त्याचबरोबर या संकटाचा सामना करण्यासाठी प्रचंड निधीची आवश्यकता भासणार आहे. हीच बाब लक्षात घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी आपला एक महिन्याचा पगार प्रधानमंत्री सहायता निधीत (Prime Minister Relief) देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या कठीण काळात गोरगरीबांचे हाल होऊ नये म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कालच (26 मार्च) विशेष पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमध्ये गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1,70000 कोटी रुपयांची तरतूद विविध स्तरातील नागरिकांसाठी करण्यात आली आहे. तसंच संकटाचा सामना करण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. (Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले कोरोना व्हायरस विरोधात केंद्र सरकारचे विशेष पॅकेज; कर्मचारी, महिला, शेतकरी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार मदत)
ANI Tweet:
कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशात 606 कोरोनाग्रस्त रुग्ण असून महाराष्ट्रात हा आकडा 130 वर पोहचला आहे. त्यामुळे पुढील काळ देशवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आकडा वाढू नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही विविध माध्यमातून सूचना पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरी देशावर घोंगावणारे कोरोना व्हायरसचे गंभीर संकट दूर करण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.