Covid-19: देशात एका दिवसात 636 कोरोनाबाधित, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या गर्दीमुळे संसर्ग वाढला
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह दर 2 च्या वर पोहोचला आहे.
नव्या वर्षात कोविड-19 (Covid New Cases) चा संसर्ग सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटचा (Omicron Sub-Variant JN.1) वाढता धोका पाहायला मिळत आहे. नवीन वर्षात भारतातील (Coronavirus Update in India) कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 4394 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 636 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दीच्या ठिकाणी जाण्यामुळे संसर्ग वाढला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी दरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. (हेही वाचा - COVID-19: कोरोनाचा JN.1 सब-वेरिएंट दहा राज्यांमध्ये पसरला, आतापर्यंत 196 रुग्ण आढळले, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण)
कर्नाटक कोरोना विषाणूची परिस्थिती चिंताजनक आहे आणि कर्नाटकात गेल्या 24 तासात 296 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह दर 2 च्या वर पोहोचला आहे. एकीकडे थंडीला सुरुवात झाल्याने हवामानात मोठा बदल जाणवत आहे, त्यातच नव्या JN.1 कोरोना व्हेरियंटचा धोका, यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
देशात कोरोनाच्या JN.1 सब-व्हेरियंटच्या एकूण 197 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये केरळमध्ये 83, गोव्यात 51 आणि गुजरातमध्ये 34 रुग्ण हे सर्वाधिक संसर्ग असलेले तीन राज्य आहेत. याशिवाय या राज्यांमध्ये कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा आणि दिल्ली या राज्यांचाही समावेश आहे.