Coronavirus: केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन स्वत:च्या घरी विलगिकरण कक्षात; COVID 19 बाधित डॉक्टरांशी आला होता संपर्क
तेथे त्यांचा संपर्क एका डॉक्टरांशी आला. दरम्यान, या डॉक्टरची कोरोना व्हायरस बाबतची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही माहिती मुरलीधरन यांना मिळताच त्यांनी स्वत:हूनच विलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय घेतला.
केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन यांनी स्वत:हूनच स्वत:ला विलगीकरण कक्षात ठेवल्याचे वृत्त आहे. मुरलीधरन हे कोरोना व्हायरस लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर ज्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे त्या रुग्णालायाला भेट देण्यास गेले होते. दरम्यान, या रुग्णालयाला भेट देऊन आल्यानंतर त्यांना स्वत:मध्ये काही बदल जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी स्वत:हून विलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्यांच्यावर कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, व्ही मुरलीधरन हे केरळ येथील एका रुग्णालयात भेटीसाठी गेले होते. तेथे त्यांचा संपर्क एका डॉक्टरांशी आला. दरम्यान, या डॉक्टरची कोरोना व्हायरस बाबतची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही माहिती मुरलीधरन यांना मिळताच त्यांनी स्वत:हूनच विलगीकरण कक्षात राहण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Coronavirus Outbreak In India: कर्नाटक मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 76 वर्षीय रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही COVID-19 ची लागण)
भारतात कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची संख्या 141 इतकी झाली आहे. देशातील कोरोना व्हायरस बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या विदेशी व्यक्तींची संख्या 17 होती. ती आता 22 वर पोहोचली आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे.