Coronavirus Lockdown: लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात Green Zone मध्ये पान आणि दारुची दुकाने सुरु होणार पण नियमांचे पालन करावे लागणार
त्यामुळे केंद्र सरकारने आता लॉकडाउनचे आदेश वाढवले असून येत्या 17 मे पर्यंत कायम राहणार आहेत. यापूर्वी 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता विविध राज्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता लॉकडाउनचे आदेश वाढवले असून येत्या 17 मे पर्यंत कायम राहणार आहेत. यापूर्वी 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश लागू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता विविध राज्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आता केंद्र गृहमंत्रालयाने ग्रीन झोनमध्ये लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्रीन झोनमध्ये दारु आणि पानाची दुकाने सुरु राहणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र नियम जरी शिथिल केले असल्यास त्या संदर्भातील नागरिकांना आणि दुकानदारांना नियमाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
केंद्र गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार, ग्रीन झोनमध्ये दारु आणि पानाची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. मात्र त्यावेळी नागरिकांनी एकमेकांपासून दुकानात प्रवेश करताना कमीतकमी 6 फूट अंतर ठेवणे आवश्यक असणार आहे. त्याचसोबत एकाच वेळी फक्त 5 नागरिक दुकानाबाहेर उपस्थित राहू शकतात असे ही स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु रेड झोनमध्ये कोणत्याही गोष्टींसाठी सूट देण्यात आलेली नाही. त्याचसोबत संपूर्ण भारतात काही गोष्टी पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानुसार विमान सेवा, रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतूकीसह कोचिंग संस्था लावणे यावर पूर्णपणे निर्बंध कायम असणार आहेत. या लॉकडाउन दरम्यान, ऑरेंज झोनमध्ये टॅक्सी आणि कॅब अॅग्रिगेटर्सना परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यावेळी फक्त 1 ड्रायव्हर आणि 2 प्रवासी असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(Coronavirus: भारतात गेल्या 24 तासांत 1755 जणांना कोरोनाची लागण, तर 77 जणांचा कोरोनामुळे बळी; देशातील कोरोना बाधितांची संख्या 35365 वर पोहोचली)
India Lockdown: लाॅकडाऊन मध्ये २ आठवड्यांची वाढ; १७ मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय - Watch Video
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 21 दिवसांच्या लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला होता. 14 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन संपल्यानंतर तो पुन्हा वाढवून 3 मे पर्यंत कायम ठेवण्यात आला होता. परंतु तरीही कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने केंद्र सरकारने आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यात रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये जिल्ह्यांची विभागणी करण्यात येणार आहे. त्याचसोबत विविध राज्यात फसलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी रेल्वे आणि बस सेवा सुरु करण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.