Coronavirus Lockdown Relaxed: देशभरातील नोंदणीकृत दुकाने सुरु करण्यास MHA ची परवानगी; लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या

त्यामुळे कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात MHA च्या आदेशानुसार नेमकं काय सुरु राहणार आणि काय बंद? जाणून घ्या...

Shops reopen in Mumbai after MHA order (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत देश सध्या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन मध्ये आहे. या टप्प्यात सरकारने काही नियम शिथिल करत नॉन हॉटस्पॉट शहरांमधील दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. आदेशानुसार, केवळ 50% कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने आजपासून (25 एप्रिल) दुकाने सुरु करण्यात आली आहेत. मात्र गृहमंत्रालयाचे हे आदेश केवळ नॉन हाटस्पॉट आणि कंटनमेंट झोन नसलेल्या ठिकाणीच लागू करण्यात आले आहेत. (गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबई, दिल्लीसह देशातील नोंदणीकृत दुकाने आजपासून ग्राहकांसाठी खुली, पाहा फोटोज)

गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, देशभरातील नोंदणीकृत दुकाने त्याचप्रमाणे रहिवाशी भागातील दुकाने यांना लॉकडाऊनच्या नियमातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीतील बाजार संकुले सुरु करण्यास परवागनी देण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई मधील कुर्ला परिसरातील दुकानांबाहेर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली.

ANI Tweet:

मात्र मल्टी ब्रँड आणि सिंगल ब्रँड असलेले मॉल्स खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसंच दुकानांमध्येही 50% कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मास्क वापरणे बंधनकारक आहे.

Coronavirus Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात नेमंक काय सुरु राहणार?

देशातील सर्व नोंदणीकृत दुकाने.

रहिवाशी कॉम्प्लेक्स मधील दुकाने.

सलून.

Coronavirus Lockdown च्या दुसऱ्या टप्प्यात काय बंद राहणार?

मॉल्स.

सिनेमागृह, नाट्यगृह.

स्विमिंग पूल्स, कल्ब्स.

मल्टी ब्रँड आणि सिंगल ब्रँड मॉल्स.

बाजार संकुलातील दुकाने.

शैक्षणिक संस्था.

धार्मिक स्थळे.

दारुची दुकाने, बार्स खुली होणार?

दारुची दुकाने आणि बार्स यांना मद्यविक्री करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट अॅक्ट अंतर्गत येणारी दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. दारुची दुकाने, बार्स या कायद्याअंतर्गत येत नसल्याने ती बंदच राहणार आहेत.

प्रत्येक राज्यातील मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी यांना गृहमंत्रालयाने हे आदेश दिले आहेत. लॉकडाऊन सुरु ठेवण्यासाठी आवश्यक नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. 15 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार, फक्त इंडस्ट्रीज आणि व्यापारी संथ्या लॉकडाऊन दरम्यान सुरु राहतील असे म्हटले होते. त्या आदेशात काहीसे बदल करत गृहमंत्रालयाने हे नवे आदेश जाहीर केले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमधील ही शिथिलता राज्य सरकारने प्रत्येक भागातील कोरोनाच्या परिस्थितीनुसार द्यावेत, असेही यात नमूद करण्यात आले आहे.