Coronavirus Lockdown: लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या 17 मे पर्यंत नागरिकांसाठी रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार
याच दरम्यान आता शनिवारी रेल्वे मंत्रालयाने एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, 17 पर्यंत प्रवाशांसाठी कोणतीही रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार नसल्याने पूर्णपणे बंद राहणार आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश येत्या 17 मे पर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. याच दरम्यान आता शनिवारी रेल्वे मंत्रालयाने एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, 17 पर्यंत प्रवाशांसाठी कोणतीही रेल्वेसेवा सुरु करण्यात येणार नसल्याने पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच भारतीय रेल्वेने उपनगरीय ट्रेनसह सर्व नियमीत प्रवासी रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी तिकिट बुकिंग करण्यासाठी किंवा प्रवास करण्याच्या हेतून रेल्वेस्थानकात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र मध्य रेल्वेकडून अत्यावश्यक सेवासुविधांची वाहतूक केली जाणार आहे.
तसेच DGCA यांनी सुद्धा देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे येत्या 17 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. डीजीसीए यांनी एक सर्कुलर जाहीर करत असे म्हटले आहे की, देशभरात येत्या 17 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. याच कारणास्तव आता 17 मे रात्री 11.50 वाजेपर्यंत विमान उड्डाणे रद्द केली आहेत. मालवाहू विमाने आणि परवानगी असलेल्या विमानांसाठी हा नियम लागू नसणार नाही आहे. महानिर्देशलयाने असे सांगितले आहे की, देशात विमान सेवा देणाऱ्यांना देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांबबात पूर्व सुचना दिली जाणार आहे.(Shramik Special Trains: नाशिक येथून 845 कामगारांना घेऊन उत्तर प्रदेशसाठी रवाना झालेली पहिली विशेष ट्रेन उद्यापर्यंत लखनऊ येथे पोहचणार; अवनीश अवस्थी यांची माहिती)
सध्या विविध राज्यात लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. तसेच विद्यार्थी, पर्यटक यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात अडकलेल्यांना सरकारकडून मदत करण्यात येत असून त्यांच्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आली आहे. या ट्रेनची सुरुवात 1 मे पासून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर गृह मंत्रालयाने रेल्वे बोर्डाला स्पेशल ट्रेन सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.