Coronavirus: भारतात गेल्या 24 तासात 704 नवे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आकडा 4281 वर पोहचला
भारतात गेल्या 24 तासात 704 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 4281 वर पोहचला आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसागणिक त्याच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. तसेच सरकारने सर्वत्र लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या काळात नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. लॉकडाउनच्या काळात धार्मिक कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीत तबलीगी जमातीकडून धार्मिक कार्यक्रमाचे योजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जवळजवळ हजारोंच्या संख्येने विविध ठिकाणाहून नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असल्याचे दिसून आले आहेत. तर भारतात गेल्या 24 तासात 704 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 4281 वर पोहचला आहे.
आरोग्यमंत्रालयाकडून कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर करण्याात येते. भारतात आता पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 4281 वर पोहचला आहे. तसेच मृतांचा आकडा 111 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 318 जणांना कोरोनावर उपचार दिल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत.(निजामुद्दीहून परतलेल्या कोरोनाबाधीत तरूणाच्या वाहनाला अपघात; माहिती लपवल्यामुळे उपचार करणाऱ्या 40 डॉक्टरांसह 50 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हातावर क्वारंन्टाईनचा शिक्का)
दरम्यान, देशातील सध्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पाहिला तर त्यामध्ये नव्या रुग्णांची अधिक भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप सरकारकडून लॉकडाउनचे आदेश वाढवण्यासंबंधित कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.